ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वास्तुनुसार फुटकी भांडी, फुटकं नशीब

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वास्तुनुसार फुटकी भांडी, फुटकं नशीब

शहर : मुंबई

आपल्या घरातली भांडी आपल्या जीवनशैलीची ओळख घडत असतात. त्यामुळेच आजकाल डिझायनर भांडी वापरण्याची क्रेझ आली आहे, पण नवी डिझायनर भांडी वापरताना जुनी, तुटकी फुटकी भांडी सांभाळून वेगळी ठेवली जातात. अशी तुटकी भांडीवेगळी ठेवणं हे अशुभ आहे. घरात अशी फुटकी भांडी ठेवल्यामुळे दारिद्रय येण्याची शक्यता असते. याचबरोबर इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

घरात कधही तुटकी-फुटकी भांडी वापरू नयेत किंवा फुटक्या भांड्यात जेवू नये. धर्मशास्त्रात असं सांगितलं आहे की अशा फुटक्या भांड्यात जेवल्यास ईश्वराची कृपा राहत नाही. जी व्यक्ती फुटक्या भांड्यात जेवते, तिच्यावर लक्ष्मी रुसते आणि त्या घरातून निघून जाते. यामुळे घरावर आर्थिक संकटं कोसळतात. वास्तुशास्त्रानुसारही फुटकी भांडी घरात असणं अशुभच मानलं जातं. ज्या घरात फुटकी भांडी असतात, त्या घरात वास्तुदोष असतो. यातून उत्पन्न झालेला दोष इतर उपाय करूनही नष्ट होत नाही. फुटक्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच, घरात अशा प्रकारची भांडी ठेवू नयेत. अशी भांडी फेकून दिल्यास वास्तुदोष मिटतो आणि घरात शुभ घटना घडू लागतात.

खराब भांड्यात जेवण जेवल्यास आपले विचारही नकारात्मक बनतात. जशा ताटात आपण जेवतो, तसा आपला स्वभाव बनतो. म्हणूनच जेवण नेहमी स्वच्छ आणि चांगल्या ताटात करावे. यामुळे आपले विचारही शुद्ध होतात आणि त्याचा आपल्यावर चांगला परिणाम होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

 

मागे

वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा
वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा

ज्‍योतिष शास्‍त्रानुसार आपल्‍या आजुबाजुच्‍या वातावरणात अनेक उर्जा का....

अधिक वाचा

पुढे  

वास्तुनुसार ग्रहांचा स्वभाव व प्रभाव
वास्तुनुसार ग्रहांचा स्वभाव व प्रभाव

सूर्य - : पुरुष जातीचा, रक्त वर्ण, पित्त प्रकृतीचा, पूर्वेचा स्वामी. हा आत्मा, ....

Read more