ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 09:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

 राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

शहर : मुंबई

मेष

आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. गुप्तशत्रूपासून सावध राहा. रहस्यमय गोष्टीत गोडी वाटेल आणि गूढ विद्येप्रती आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवे कार्य हाती घेऊ नका. आध्यात्मिक सिद्धि प्राप्त होईल.

वृषभ

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. स्वकीय आणि जवळच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या वार्ता येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. विवाह सुख मिळेल. अचानक धनलाभ होईल.

मिथुन

कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची पण आज शक्यता आहे. महत्त्वाच्या विषयांवर खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. तरीही आपण वाणी आणि क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा मनाला ठेच लागेल. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. त्याच बरोबर मान- सन्मान ही प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.

कर्क

शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळा. शक्य असेल तर प्रवासही करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहा.

सिंह

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आईशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक दृष्टीने नकारात्मकतेचा पगडा राहील. स्थायी संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता बाळगा. पाण्यापासून जपा. तब्बेतीकते आज विशेष लक् द्या.

कन्या

शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी असणारे संबंधात माधुर्य वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. गूढ आणि आध्यात्मिक विषयात सिद्धी प्राप्त होईल.

तूळ

द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यामुळे परिणाम सकारात्मक मिळतील. कुटुंबीयांशी वादविवाद टाळा. तब्बेतीकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक

आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.

धनु

उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. अपघातापासून जपा. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. तब्बेतही बिघडेल. शांतता मिळण्याच्या दृष्टीने ईश्वराची उपासना आणि आध्यात्मिकता उपयोगी पडेल.

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहोत्सुकांना इच्छित साथीदार लाभल्याने आनंद वाटेल. व्यापारातही दिवस लाभदायी ठरेल. सहली- प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल.

कुंभ

आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होतील. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. त्या कामातून लाभ होईल.

मीन

वरिष्ठ अधिकार्‍यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका आणि मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. हा प्रवास यशस्वी होईल. व्यापारीबंधूंना व्यापारत अडचणी येण्याची शक्यता आहे.

मागे

साप्ताहिक  राशि फल - 21-04-2019 - 27-04-2019
साप्ताहिक राशि फल - 21-04-2019 - 27-04-2019

    मेष आठवडयाच्या सुरवातीस आपणास कामात काहीसा थकवा व कंटाळा जाणवेल. अ....

अधिक वाचा

पुढे  

राशीभविष्य - 23 एप्रिल 2019
राशीभविष्य - 23 एप्रिल 2019

मेष नवीन कामाला सुरुवाता करण्याचा गणेशजींचा सल्ला आहे. गूढ विद्या तसेच रह....

Read more