By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मेष
आज आपण आपला संताप काबूत ठेवा असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या धार्मिक वा मंगल प्रसंगाला हजेरी लावाल. तीर्थाटनाला जाऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मतभेद होतील.
वृषभ
कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नवे काम आज सुरू न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. ध्यान धारणेने मानसिक स्वास्थ्य मिळवू शकाल.
मिथुन
शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहनसुख मिळेल. भिन्नलिंगीय व्यक्तीबाबत आकर्षण वाटेल.
कर्क
श्रीगणेश कृपेने आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल. आपल्या अधीन असणार्या व्यक्ती आणि सहकारी यांचे उत्तम सहकार्य मिळेल. तब्बेत चांगली राहील.
सिंह
लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती चांगली राहील. धार्मिक परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल, असे श्रीगणेश सांगतात.
कन्या
श्रीगणेश सांगतात की आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. स्थावर मालमत्ता, वाहन इ. संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.
तूळ
शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभाचे योग आहेत. पैशाच्या गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल असल्याची माहिती श्रीगणेश देत आहेत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. भाग्योदय होईल.
वृश्चिक
कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनात येणारे नकारात्मक विचार हद्दपार करा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उद्भवू नयेत याकडे लक्ष द्या. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य तुम्हाला बेचैन करेल.
धनु
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आर्थिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. सगेसोयरे व मित्रांच्या येण्याने मन खुश राहील. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील. मान- मरातब वाढेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याचा आनंद मिळेल.
मकर
आज सावधानतेने वागण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. तब्बेतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. धार्मिक व सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल.
कुंभ
श्रीगणेश कृपेने आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. नोकरी- व्यवसायात लाभ प्राप्ती. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी आणि मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल. अविवाहितांना विवाहयोग आहेत.
मीन
श्रीगणेश सांगतात की नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज आपणाला अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार्यांना व्यापारवृद्धी होईल आणि उर्वरित रक्कम प्राप्त होईल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मानसन्मान किंवा उच्चपद मिळेल.
मेष आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही र....
अधिक वाचा