ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राशीभविष्य, रविवार, ९ ऑगस्ट २०२०

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2020 07:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राशीभविष्य, रविवार, ९ ऑगस्ट २०२०

शहर : मुंबई

मेष:-नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल.

 

वृषभ:-मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

 

मिथुन:-जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका.

 

कर्क:-ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा.

 

सिंह:-दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता.

 

कन्या:-नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

 

तूळ:-आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.

 

वृश्चिक:-गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका.

 

धनू:-जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.

 

मकर:-मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा.

 

कुंभ:-निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल.

 

मीन:-मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल.

मागे

मासिक भविष्यफल एप्रिल (2020)
मासिक भविष्यफल एप्रिल (2020)

मेष -: नोकरदार व्यक्तींना एप्रिलपर्यंत एखादी चांगली संधी उपलब्ध होईल. त्या....

अधिक वाचा

पुढे  

9 ते 15 नोव्हेंबर 2020 साप्ताहिक राशीफल
9 ते 15 नोव्हेंबर 2020 साप्ताहिक राशीफल

मेष : या आठवड्यात तुम्हाला मानसिक सुख आणि दुःख दोघांचा अनुभव होणार आहे. व्यक....

Read more