By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आचार्य चाणक्य मौर्य वंशाचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे महामंत्री होते. चाणक्य याना कौटिल्य आणि विष्णुगुप्त नावानेही ओळखले जाते. त्यांनी नंदवंशचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यला राजा बनवले. चाणक्य यांनी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राची रचना केली होती. नीती शास्त्रामध्ये जीवन सुखी आणि यशस्वी बनवण्याचे सूत्र सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, आचार्य चाणक्यांच्या काही खास नीती...
1. प्रत्येक मैत्रीमागे कोणता ना कोणता स्वार्थ नक्की असतो. अशी एकही मैत्री नाही ज्यामध्ये स्वार्थ नाही. हे एक कटू सत्य आहे.
2. व्यक्ती एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो तसेच आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ स्वतःच भोगतो. तो एकटाच स्वर्गात किंवा नरकात जातो.
3. साप विषारी नसला तरीही त्याने स्वतःला विषारी दाखवावे म्हणजेच व्यक्तीने स्वतःला योग्य असल्याचे दाखवावे.
4. तुम्ही ठरवलेली योजना कोणालाही सांगू नये आणि रहस्य कायम ठेवून ठरवलेले काम करण्यासाठी दृढ राहावे.
5. ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे. एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मान प्राप्त करतो. ज्ञान, सौंदर्य आणि योवनाला पराभूत करते.
6. भय तुमच्या जवळ येताच त्यावर आक्रमण करून त्याला नष्ट करावे.
8. कोणताही व्यक्ती आपल्या कार्याने महान बनतो, जन्माने नाही.
9. ज्याप्रकारे वाळलेल्या झाडाला आग लावल्यास ते झाड संपूर्ण जंगल जाळून टाकते त्याचप्रमाणे एक पापी पुत्र संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करतो.
10. आपण भूतकाळाचा पश्चाताप करू नये आणि भविष्यविषयी चिंतितही होऊ नये. समजूतदार व्यक्ती नेहमी वर्तमानात जगतो.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगला-वाईट काळ असतो. वाईट परिस्थिती निर्मा....
अधिक वाचा