By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 09:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मेष - काही नवीन अनुभव येऊ शकतात. काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. त्यात यश मिळेल. स्वत:चे मत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांचे बोलणेही समजण्याचा प्रयत्न करा. आज प्रत्येक व्यक्ती आणि कामातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी दिवस चांगला आहे.
वृषभ - दिवस चांगला आहे. पैशांसंबंधी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक आव्हानासाठी तयार राहा. नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक राहाल. एखाद्याला महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी सल्ला द्याल. जुन्या नुकसानीची भरपाई होऊ शकते. आज फ्री होऊन काम करा. मित्र, भावंड आणि सोबत काम करणाऱ्यांची मदत मिळेल.
मिथुन - स्वत:च्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांबाबतीत ऑफर मिळू शकते. त्यावर गंभीरतेने विचार करा. करियर, कॉन्टॅक्ट आणि इमेजसाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. महिलांसाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क - लोकांशी संबंध वाढवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरसाठीच्या शक्यता अधिक स्पष्ट होतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वपूर्ण गोष्टीबाबत माहिती मिळू शकते. तुमच्या काम आणि जबाबबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जवळच्या लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. अचानक धनलाभामुळे खुश व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.
सिंह - दुसऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी काम करण्यास उत्साही असाल. कितीही व्यस्त असाल तरी कुटुंबातील व्यक्तींशी फोनवरून कॉन्टॅक्ट ठेवा. काही महत्त्वपूर्ण कामात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याची नवीन संधी मिळू शकते. अधिक उत्पन्नाचा योग आहे. एखाद्या मांगलिक कामात सहभागी होण्याची शक्यता आहे.
कन्या - दिवस चांगला आहे. पैशांची समस्या संपेल. एखाद्या खास व्यक्तीकडून सल्ला किंवा मदत मिळू शकते. कामात सक्रिय राहाल. अनेक गोष्टी सहजतेने सुटतील. एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत तुमच्या मनातील गोष्ट शेअर करु शकता. वृद्ध व्यक्तीची मदत कराल. अनेक कामं वेळेत पूर्ण होतील.
तुळ - एखाद्या खास कामाबाबत उत्साही असाल. नवीन अनुभव येतील. व्यावसायिक लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करियरमध्ये फायदा होईल. व्यवसायात एखादी डील करायची असल्यास त्यासाठी दिवस चांगला आहे. दुसऱ्यांना तुमचं म्हणणं सदहतेने समजावून द्याल. गेल्या अनेक दिवसांपासून विचार केलेलं काम कराल. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत यश मिळेल. धार्मिक कामांत सहभाग घ्याल.
वृश्चिक - अनेक गोष्टी चागंल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. नवीन माहिती मिळेल. प्रत्येक गोष्टीचे उत्तर तुमच्याकडे असेल. एकट्यानेच सर्व कामं करण्याची इच्छा होईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील.
धनु - पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळतील. वेळ तुमच्यासोबत आहे. एखाद्या खास कामासाठी योग्य वेळी, योग्य ठिकाणी उपस्थित असाल. त्यामुळे संधीचा फायदा करून घ्या. एखाद्या वादातही यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर - मिळेल तसा आराम करा. एखाद्या योजनेवर काम करत असाल तर पैशांच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जोडीदारासाठी एखादं गिफ्ट घेऊ शकता. खासगी प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. विचार करून बोलाल तर काही समस्या सोडवू शकाल. नवीन कामासाठी दिवस चांगला आहे. कामात मन लागेल.
कुंभ - कायदेविषयक गोष्टीबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत कामासंबंधी एखादी योजना आखू शकता. लोकांशी भेट होऊ शकते. यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल.
मीन - तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. व्यवसायात लोक तुमच्याशी सहमत होतील. ऑफिस आणि व्यवसायात यशदायक दिवस आहे. एखाद्या खास व्यक्तीला प्रभावित करू शकाल. एखाद्या विश्वासू मित्राची मदत घेऊनच काम करा. एखाद्यासोबत अचानक झालेली भेट प्रेमसंबंधांची सुरुवात करु शकते. आत्मविश्वास वाढेल.
मेष - बेरोजगारांसाठी दिवस शुभ असण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यास....
अधिक वाचा