ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तणाव हा उद्यमशीलतेचा एक भाग,नकारात्मकता हावी होऊ देऊ नका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तणाव हा उद्यमशीलतेचा एक भाग,नकारात्मकता हावी होऊ देऊ नका

शहर : मुंबई

कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही. जी. सिध्दार्थ यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येने उद्योजकांवर वाढत असलेल्या कामाचा ताण आणि दबाव प्रकाशझाेतात आला. सिध्दार्थ काही एकटेच काही असे उद्योजक नाहीत ज्यांनी दबाव सहन केला आणि एवढे मोठे पाऊल उचलले. देशातील सर्वात मोठी कॉमर्स कंपनी इंडिया प्लाजाचे सहसंस्थापक के. वॅथीस्वरन यांनाही अपयश आल्याने त्यांच्याही मनात एकदा आत्महत्येचा विचार आला होता. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यातून उद्योजकांना ताण येतो, याचे संकेत मिळतात. तुम्ही याला कसे हाताळता यावर तुमच्यावर पडणारा प्रभाव अवलंबून असतो. जर तुम्हीही असे उद्योजक आहात ज्याला तणावाशी झगडावे लागते, तर येथे काही तरुण उद्योजक सांगत आहेत की, कसे स्वत:ला मानिसकदृष्ट्या स्वस्थ ठेवू शकता आणि या गोष्टींचा अवलंब करुन स्वत:ला कसे तणावापासून दूर ठेवू शकता.

समस्या नव्हे, उपायांवर लक्ष केंद्रित करा

मानसिक संतुलन राखण्यासाठी समस्या कायम नाही, हे समजून घ्या. बहुतेक परिस्थितींमध्ये काळाबरोबर त्या सुटत जातात आणि समस्येवर लक्ष देऊन तणाव वाढवण्यापेक्षा उपायांवर भर द्या. मी सकाळी ध्यान आणि व्यायामासाठी एक- एक तास देतो त्यामुळे पुढील १८ तास सहज जातात. मी समस्यांवर सगळ्यांशी चर्चा करतो.

तणाव असेल तर -: मोकळे व्हा. लोकांशी चर्चा करा. तणावात किंवा भीतीने कोणतेही पाऊल उचलू नका. अहंकारापासून जेवढे लांब राहता येईल तेवढे लांब राहा. चूक झाल्यास माफी मागा. दररोज स्वत:वर प्रेम करा. जे आपण करू शकता, त्यासाठी आभारी राहा. ध्यान करा आणि जर करू शकत नसाल तर काही मिनिटे नाचा, गाणे गा किंवा काही तरी करा. वेळ काढून आपल्या प्रगतीसाठी काही तरी करा. यापेक्षा जास्त महत्त्वाचे काही नाही. -अंकुर गेरा, संस्थापक सीईअो, जंगली गेम्स

मोकळेपणाने सल्लागाराशी बोला

तरुण तणावाखाली लवकर येतात. सुरुवातीला स्वत:ला मोकळे करा. मी अशा काही गटांमध्ये सामील आहे, ज्यात विविध मुद्यांवर चर्चा होते. कोणतीही अडचण आल्यास मित्रांकडे आिण सामान्य स्थितीत परतू शकेल याचा निश्चय करतो.  

तणाव असेल तर -: मार्गदर्शन घ्या. जर आपला सल्लागार ज्यात माजी सहकारी, माजी वरिष्ठ किंवा इतर तर त्याच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. एखादी गोष्ट आपणाला महत्त्वाची वाटत असेल पण ती तशी नसेल हे आपणाला माहीत नसेल. आपल्याला नवी कल्पना सुचेल. इतरांची भेट घेत राहा. नव्या गोष्टींची माहिती ठेवा. -संतोष पांडा, सहसंस्थापक सीईओ, एक्सप्लारा

दुसऱ्यांच्या विचारांनी प्रभावित होऊ नका

उद्योगात सतत स्पर्धा आहे. यामुळे संघर्ष करण्यापेक्षा आव्हानांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही चांगली टीम तयार करुन त्यांना सल्ला देत जबाबदारी सोपवून मोठी मदत मिळवू शकता. कुटुंब, पुस्तके, प्रवास, संगीत आणि आध्यात्मिकता मला मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्यास मदत करते.

तणाव असेल तर -: कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी आधी एक दिवस काही छोटी लक्ष्य निश्चित करा, ज्याना सहज पूर्ण करता येईल. भावनिक, सामाजिक पातळीवर मजबूत राहणे आवश्यक आहे, -अचिन भट्टाचार्य, संस्थापक सीईओ, नोटबुक

आवश्यक कामांसाठी डोक्यात कप्पे बनवा लक्ष्य पूर्ण करण्यापासून ते सरकारी नियमांचे पालन करण्यापर्यंत उद्योगात अनेक प्रकारचे दबाव असतात. मी माझ्या डोक्यात अनेक प्रकारचे कप्पे बनवून आपले मानसिक संतुलन कायम ठेवते. एक कप्पा बंद करुन दुसरा उघडते. मला सर्व कप्पे बंद करण्यासाठी रोज ३० मिनिटे लागतात आिण त्यानंतर मी चालणे, पोहोणे किंवा योग करते. मी गेल्या चार वर्षात अनेकदा सल्लागाराची सेवा घेतली आहे आणि आता मी कोणत्याही वाईट स्थितीतून स्वत:ला बाहेर काढण्यात सक्षम आहे.

तणाव असेल तर-: मदत घ्या. मदत घेणे आपल्याला कमकुवत बनवत नाही. काही असे लोक (सल्लागार, संस्थापक, सहकारी) आपल्यासोबत ठेवा, ज्यांच्याशी आपण आव्हानांशी मोकळेपणाने बोलू शकाल. यामुळे चांगली मदत मिळते. -अर्पिता गणेश, संस्थापक सीईओ, बटरकप्स

 

 

 

                                                                                                                                                                                                                                                                                                                        सौ. दिव्य मराठी

 

मागे

भूतकाळाचा पश्चाताप करू नये आणि भविष्यविषयी चिंतितही होऊ नये
भूतकाळाचा पश्चाताप करू नये आणि भविष्यविषयी चिंतितही होऊ नये

आचार्य चाणक्य मौर्य वंशाचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे महामंत्री होते. च....

अधिक वाचा

पुढे  

साप्ताहिक राशीफल 15 ते 21 मार्च 2020
साप्ताहिक राशीफल 15 ते 21 मार्च 2020

मेष -: शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रा....

Read more