By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 05:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्या घरात सुख-समाधान नांदावं, शांतता रहावी या इच्छेनं महिला पूजा-प्रार्थना करत असतात. विविध व्रत अंगिकारत असतात. याच प्रयत्नात घराच्या रचनेत काही दोष नाहीत ना? हे पहायला हवं. हे दोष तुमच्या सुखी घराच्या स्वप्नपूर्तीत बाधा आणत असतात. हे टाळण्यासाठी घर बांधताना दिशांचा विचार व्हावयास हवा.
उत्तर दिशेचा स्वामी कुबेर असून तो धानाचा देव आहे. घर बांधताना उत्तर दिशेकडे जास्तीत जास्त मोकळा भाग राहील हे पहाव. यामुळे जीवनात आर्थिक स्थिती चांगली राहते. उत्तर म्हणजे अतिउत्तम, सतत वृद्धी होत राहणारा, त्यामुळे घरातील तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला ठेवणं फायद्याचं ठरतं. कार्यालयात बसल्यावर, घरी जेवण करताना आपलं तोंडही उत्तर दिशेस राहील असं पाहावं. घराच्या उत्तर, ईशान्य वा पूर्व कोपर्यात पाण्याची टाकी, स्विमींग पूल असल्यास सुखी आणि समृद्ध जीवनाची प्राप्ती होते. परंतु या भागात कोठीघर नसावं किंवा ती वाहने ठेवण्याची जागाही नसावी. त्या ऐवजी या दिशेला मुख्य दरवाजा, व्हरांडा, बैठकीची खोली किंवा बाल्कनी असणं उचित ठरेल. हे लक्षात घेऊन घराची रचना करणं संपूर्ण कुटुंबासाठी फायद्याचं ठरेल.
सूर्योद हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच पूर्व दिशेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि ते वास्तुशास्त्रातही लक्षात घेण्यात आलं आहे. घरातील स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व असल्यास सूर्यकिरणठ स्वयंपाकघरात सहज प्रवेश करू शकतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेता संचार होतो.
घराच्या उत्तर-पूर्व भागात अधिक दरवाजे तसेच खिडक्या असाव्यात असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. घर बांधताना दक्षिण आणि पश्चिमेकडील भाग उंच ठेवावा. घरात समोरासमोर खिडक्या असल्यास हवा खेळती राहते आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते.वास्तुशास्त्रानुसार घराच्या चारही बाजूस मोकळी जागा असणं हितावह ठरतं. यामुळे कोंदटपणा कमी होतो.
आजच्या युगात प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याच्याजवळ त्याचा मालकीचे ....
अधिक वाचा