By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक ५ हा अतिसौम्य आणि शुभ ग्रह मानला जातो. बुध हा विद्या, बुद्धी, व्यापार, बौद्धिक क्षमता आणि त्याचबरोबर नवीन नवीन रचनात्मक विचारांचा स्वामी आहे. बुध अकस्मात मिळणाऱ्या धनाचा मालक आहे. बुध शारीरिक कष्ट अथवा शारीरिक शक्ती प्रदान करत नाही. परंतु बुधामुळे मानसिक शक्ती मोठय़ा प्रमाणावर प्राप्त होते. यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व पार्यासारखे आकर्षक आणि चंचल असते. बौद्धिक आणि मानसिक दृष्टय़ा हे लोक खंबीर असतात. संख्याशास्त्रात हा अंक नवीन विचार आणि राजकारण्यांचा अंक मानला जातो.
या लोकांच्या मनावर त्याचबरोबर डोक्यात सदैव नवीन काहीतरी करण्याची उत्तेजना प्रेरित असते. क्वचितप्रसंगी संबंध बिघडल्यास ते पुन्हा पूर्ववत कसे करावेत, याचे त्यांना उत्तम ज्ञान असते. एकूणच यांच्यामध्ये नेतृत्वगुण हा प्रामुख्याने जाणवतो.
यांचा स्वभाव हसरा खेळता असून, लोक यांच्या हसण्यावर फिदा होतात. अकस्मात एखाद्याचा राग येणं किंवा एखादी गोष्ट पटकन न आवडणं हेही यांच्याबद्दल लपून राहत नाही. वातावरणात एकूणच हसण्याचा आनंद हे अगदी आरामात देऊ शकतात.
बुद्धी, चातुर्य आणि काळाबरोबर चालण्याची कला यांना उत्तम आत्मसात करता येते. संपत्ती कमावण्याचे यांच्याकडे उत्तमोत्तम पर्याय असतात. एकूणच त्यांना असलेल्या तीव्र बुद्धीमुळे हे लोक स्वतला काळानुसार बदलत असतात.
मानसिक शक्तीचा अधिक वापर केल्यामुळे हे लोक ताणतणावात अडकून पडतात. यामुळे ते स्वतलाही सांभाळू शकत नाही. एवढंच नाही तर अपयश हे सहजासहजी पचवू शकत नाही. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचे धारिष्टय़ यांच्यात नसते.
शुभ तारीख
5,14, 23 या तारखांना महत्त्वाची कामे करावीत. याव्यतिरिक्त 2,6,11,15,20, 24,29 या तारखाही शुभ आहेत.
शुभ दिवस
बुधवार, शुक्रवार, गुरुवार हे दिवस अतिशुभ आहेत.
भाग्यशाली रंग
हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त सफेद, आकाशी रंगही उत्तम मानला जातो.
भाग्यशाली करिअर
राजकारण, शेअर्स, वकिली, सेल्समॅनशिप, संपादन, प्रकाशन संस्था
भाग्यशाली वर्ष
14, 23, 32, 41, 50, 59, 68, 77. याव्यतिरिक्त 11,15,20,24,29,33,38,42,51, 56, 60 हे वर्षही शुभ असतील.
भाग्योदयासाठी उपाय
या व्यक्तींनी बुधवारी गायीला हिरवा चारा घालावा. त्याचबरोबर पारिजातकाच्या झाडाचे मूळ खिशात ठेवावे.गणपतीची रोज उपासना करा.
तयार घरांचा वास्तुशोधनामध्ये ज्योतिषाचे विशेष महत्त्व आहे. तयार घरामधून व....
अधिक वाचा