By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपले अक्षर, लिहिण्याची शैली आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही दर्शवते. चला जाणून घ्या लेखणीने कसे ओळखू शकता व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व:
अक्षरांचा आकार
लहान अक्षर लिहिणारे लोकं एकाग्र असतात. जीवनाप्रती त्यांचा दृष्टिकोन संकीर्ण आणि उद्देशाप्रती ध्येय निश्चित असतं.
मोठे अक्षर काढणार्यांचा जीवनाप्रती दृष्टिकोन अगदी ओपन असतो. असे लोकं लवकर बोर होत नसतात. त्यांना मान- सन्मान मिळावा अशी इच्छा असते.
अक्षरांवर दबाव
अधिक दबाव टाकून अक्षर लिहिणारे लोकं भावुक असतात.
कमी दबाव टाकून अक्षर लिहिणारे आपल्या भावना व्यक्त करत नसतात.
अक्षरांमधील अंतर
अक्षरांमधील अंतर कमी ठेवणारे लोकं वेळेच्या व्यवस्थापनात निपुण नसतात.
अक्षरांमधील एकसारखे अंतर ठेवणार्या लोकांचं जीवन सुरळीत असतं. असे लोकं मानसिक रूपाने स्पष्ट आणि व्यवस्थित प्रबंधक असतात.
अक्षरांमध्ये अधिक अंतर ठेवणारे स्वातंत्र्य पसंत लोकं असतात. अशा लोकांना व्याकुल होणे आवडतं नाही. यांना आपला वैयक्तिक वर्तुळ आवडतं.
अक्षरांचे वळण
डावीकडे अक्षरांचे वळण असणारे अंतर्मुखी आणि स्वातंत्र्य प्रिय असतात.
उजवीकडे अक्षरांचे वळण असणार्या लोकांना इतरांशी भेटगाठी करायला आवडतं परंतू स्वत:च्या मूडप्रमाणे.
सरळ अक्षर असणारे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि कोणासमोरही आपल्या भावनांचे प्रदर्शन करत नसतात. असे लोकं प्रत्येक काम विचारपूर्वक करतात.
वाक्यांची दिशा
ज्यांचे वाक्य वरील बाजूला जात असतात ते आशावादी असतात आणि प्रत्येक वेळी मूड चांगला ठेवण्याचा प्रयत्न करतात.
ज्यांचे वाक्य खालील बाजूकडे वळतात ते तणाव असतात आणि थकलेले जाणवतात.
ज्यांचे वाक्य अव्यवस्थित असतात असे लोकं स्थिर नसतात.
अक्षरांचा जुळवणे
जुळलेले अक्षर काढणारे लोकं तार्किक, व्यवस्थित असतात आणि विचारपूर्वक निर्णय घेतात.
वेगवेगळे अक्षर काढणारे लोकं बुद्धिमान आणि सहज ज्ञानाने पूर्ण असतात.
घरामध्ये देवतांच्या मूर्ती, फोटो ठेवण्याची आणि देवघर बांधण्याची प्रथा प्र....
अधिक वाचा