By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या आजुबाजुच्या वातावरणात अनेक उर्जा कार्यरत असतात. त्या उर्जांसोबत आपण कशा पध्दतीने ताळमेळ बसवतो, याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. अशाच पध्दतीचे एक काम म्हणजे झोपणे. तसे पाहिल्यास हे अतिशय सामान्य काम आहे. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनवार याचा मोठा प्रभाव पडत असतो. ज्या व्यक्ती दक्षिण दिशेकडे पाय ठेवून झोपतात, त्यांच्या जीवनावर मोठा नकारात्मक परिणाम होत असतो.
असे झोपल्याने कमी होते शारीरीक उर्जा
वैज्ञानिक माहितीनुसार पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर चुंबकीय क्षेत्र असते. त्यामुळेच तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड आणि दक्षिण दिशेकडे पाय ठेवून झोपत असाल तर याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे शारीरीक उर्जा कमी होते. मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि हृदयाच्या काम करण्याच्या प्रक्रियेमध्येही बिघाड होतो.
होऊ शकतो निद्रानाशाचा विकार
उत्तर दिशेकडे धनात्मक प्रवाह असतो आणि दक्षिण दिशेकडे ऋणात्मक प्रवाह. आपले डोके धनात्मक प्रवाह आणि पायांचे स्थान ऋणात्मक प्रवाहाला अनुकुल असते. त्यामुळे जर आपण उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपत असू तर उत्तर दिशेचा धनात्मक प्रवाह आणि डोक्याचा धनात्मक प्रवाहाचे तरंग एकमेकांना विरुध्द दिशांना दुर लोटतील. यामुळे डोकेदुखी व अस्वस्थ वाटुन तुम्हाला चांगली झोप येणार नाही.
देवांचा निवास
आपल्या शास्त्रांमध्ये हे सांगितले आहे की, दक्षिणेकडे डोके व उत्तरेकडे पाय ठेवून झोपले पाहिजे. पूर्व दिशेकडे देवतांचा आणि इतर अलौकिक शक्तींचा वास असतो. त्यामुळे झोपताना कधीही पूर्व दिशेकडे पाय असू नये. पूर्व दिशेकडे सुर्याचा प्रवाह असतो त्यामुळेही या दिशेकडे पाय ठेवून झोपणे अशुभ मानले गेले आहे.
किचन घरातील सर्वात खास जागांमधील एक जागा आहे. कारण याच जागेशी घराचा वास्तू आ....
अधिक वाचा