By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घरामध्ये वास्तुदोष असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
1. घरामध्ये सूर्यप्रकाश येत नसेल तर वास्तुदोषाचा जास्त प्रभाव राहतो. रोज सकाळी घरामध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडकी-दरवाजा अवश्य उघडावा. सूर्यप्रकाशामुळे वास्तुदोष, मानसिक तणाव आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारे किटाणू नष्ट होतात.
2. घरापासून नकारात्मकता दूर राहावी यासाठी तंत्र शास्त्रामध्ये काही शुभ गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, उदा. गोमती चक्र, पिवळी कवडी आणि आंब्याचे तोरण इ. गोष्टी घरात अवश्य असाव्यात.
3. दरवाजाच्या आतील बजाज वास्तुचे तीन नाणे लाल रिबिनमध्ये बांधून लटकावून ठेवा. यामुळे घरामध्ये सकारात्मकता कायम राहते.
4. कधीकधी पाण्यामध्ये खडेमीठ टाकून घर पुसून घ्यावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
5. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. शक्य असल्यास या दिशेला सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था अवश्य करावी.
6. घरामध्ये तुळस अवश्य लावावी. यामुळे स्वप्रकरच्या अडचणी दूर होतात आणि देवतांची कृपा मिळते.
7. स्वयंपाक करताना महिलांचे मुख पूर्व दिशेला असावे. यामुळे स्वयंपाक सुपाच्य आणि चविष्ट बनतो. पूर्व दिशेला मुख करून जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचते आणि पचनशक्ती चांगली राहते.
अनेक लोकांना स्लीपिंग डिसऑर्डरची समस्या असते. झोप न येणे, मध्यरात्री झोपमो....
अधिक वाचा