By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घरामध्ये वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. घर अस्वच्छ असल्यास निगेटिव्हिटी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्यास तेथे धन आणि सुख-समृद्धी टिकत नाही. कोळ्याचे जाळंही वास्तूमध्ये निगेटिव्हिटी पसरवणारे मुख्य कारण मानले जाते. येथे जाणून घ्या, या संदर्भातील इतर काही खास गोष्टी....
घरातील वडीलधारी मंडळी सतत सांगत असतात की, घरामध्ये कोळ्याच जाळ नसावं. हा अंधविश्वास नसून यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळ्याच्या जाळ्यांची संरचना काहीशी अशी असते की, त्यामध्ये नकारात्मक उर्जा एकत्रित होते.
यामुळे घराच्या कोपर्यांमध्ये कोळ्याची जाळे-जळमट असतात. घरातील अशा भागामध्ये नकारात्मक उर्जा असते. या कारणामुळे घरात कलह, आजार आणि इतर अडचणी निर्माण होतात.
तसेच कोळ्याच्या जाळ्यांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक असतात. यामुळे म्हटले जाते की, घरात धूळ, जाळी जळमट असल्यास सुख-समृद्धीचा नाश होतो.