ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दुर्भाग्याचे कारण बनू शकते बंद आणि फुटके घड्याळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दुर्भाग्याचे कारण बनू शकते  बंद आणि फुटके घड्याळ

शहर : मुंबई

प्रत्येक घरामध्ये भिंतीवर लावलेले घड्याळ जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. घड्याळ केवळ वेळ सांगण्याचेच काम करत नाही तर चांगला काळ वाढवण्याचे कामही करते. वास्तुशास्त्रामध्ये घड्याळ आणि समयसूचक वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे. यामुळे जीवनातील शुभता वाढते. येथे जाणून घ्या, या संदर्भातील विशेष माहिती...

घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावू नये घड्याळ -

वास्तुनुसार घराची दक्षिण दिशा यमाची दिशा आहे. या दिशेला घड्याळ ठेवल्यास प्रगतीचा वेग मंद होऊ शकतो. तसेच ही दिशा घरातील मुख्य व्यक्तीची असते. यामुळे घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. फेंगशुई शास्त्रामध्येसुद्धा दक्षिण दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जात नाही. वैज्ञानिक शोधानुसार या दिशेने नकारात्मक उर्जा प्रवाहित होते. या दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार या दिशेकडे लक्ष जाईल, यामुळे वारंवार नकारत्मक उर्जेचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो.

घराच्या दरवाजावरही लावू नये घड्याळ

फेंगशुई शास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या वरील भागात घड्याळ लावणे शुभ मानले जात नाही. असे केल्यास घरातील तणाव वाढू शकतो. यामुळे घरातून आत-बाहेर जाताना जवळपासची उर्जा प्रभावित होऊ शकते. घर दक्षिणमुखी असेल तर या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे.

घरामध्ये ठेवू नये बंद घड्याळ -

बंद पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा स्तर घटतो आणि नकारात्मक उर्जा वाढते. याच कारणामुळे घरामध्ये बंद, तुटलेले घड्याळ इतर व्यर्थ सामान ठेवू नये. किंवा बंद, बिघडलेले घड्याळ दुरुस्त करून चालू करावे. घरामध्ये मधुर ध्वनी उत्पन्न करणारे घड्याळ लावावे.

घड्याळ उशीखाली ठेवून झोपू नये -

अनेक लोक हातावरील घड्याळ उशीखाली ठेवून झोपतात. यामुळे घड्याळाच्या आवाजाने झोपमोड तर होतेच त्याचबरोबर विज्ञानानुसार घड्याळातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नेटिक तरंग हृदय आणि डोक्यावर प्रभाव टाकतात.

घरातील कोणत्या दिशेला घड्याळ लावावे?

घड्याळ घराच्या पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावू शकता. या दिशांना सकारात्मक उर्जा प्रदान करणाऱ्या दिशा मानण्यात आले आहे. पूर्व दिशेला लावण्यात आलेले घड्याळ घरातील वातावरण शुभता आणि प्रेम वाढवण्याचे काम करते. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांना कामाच्या नवीन संधी प्राप्त होतात आणि उत्तर दिशेला लावलेले घड्याळ घराला आर्थिक नुकसानापासून दूर ठेवते.

मागे

कुंडली सुखी घराची
कुंडली सुखी घराची

आपल्या घरात सुख-समाधान नांदावं, शांतता रहावी या इच्छेनं महिला पूजा-प्रार्थ....

अधिक वाचा

पुढे  

दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी
दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी

आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे, कारण पाण्याशिवाय जीवन शक्य नाही.  ....

Read more