By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वास्तू शास्त्रामध्ये नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. ज्या घरामध्ये वास्तू नियमाचे पालन केले जात नाही तेथे अडचणी वाढत राहतात. येथे जाणून घ्या, वास्तूच्या छोट्या-छोट्या गोष्टी, ज्यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो.
1. देवघराच्या वर कोणतेही सामान ठेवू नये. देवघर उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ राहते. देवघरात कधीही अंधार असू नये. रात्रीसुद्धा छोटासा बल्ब लावून ठेवावा.
2. घरामध्ये स्टोअर रम आणि भातृम देवघराजवळ असू नये. याच्या जवळपास देवाचे फोटोही लावू नयेत.
3. घरातील वास्तुदोष असलेल्या भागात सकाळ-संध्याकाळ शंख वाजवावा. शंख नसल्यास पूजा झाल्यानंतर घंटी वाजवू शकता. यामधून निघणाऱ्या ध्वनीतून वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
4. दूध असलेले वृक्ष उदा- रुईचे, वडाचे झाड. घरच्या अंगणात लावू नयेत. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात.
5. घरामध्ये तुळस असणे शुभ राहते. तुमच्या घरामध्ये तुळस असल्यास रोज सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणे विसरू नका.
6. घरामध्ये बंद आणि खराब घड्याळ ठेवू नये. याच्या अशुभ प्रभावाने भाग्याची साथ मिळत नाही.
7. देवघरात दररोज सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे भाग्याशी संबंधित लाभ होतात आणि दिव्याच्या धुराने वातावरणातील सूक्ष किटाणू नष्ट होतात.
8. पलंगाच्या खाली व्यर्थ सामान किंवा चप्पल-बूट ठेवू नये. यामुळे ऊर्जेचा मार्ग अवरुद्ध होतो.
9. काही लोक तिजोरीच्या वर आणि आजूबाजूलासुद्धा इतर सामान ठेवतात. परंतु तिजोरीवर आणि आजूबाजूला कोणतेही सामान ठेवू नये. तिजोरीमध्ये कोर्ट प्रकरणाचे कागदपत्र ठेवू नयेत. धन स्थान नेहमी स्वच्छ असावे.
10. कुटुंबातील मृत सदस्यांचे फोटो देवघरात लावू नयेत. पूर्वजांचे फोटो नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) किंवा पश्चिम दिशेला लावावेत.
11. घरामध्ये फुटलेले दर्पण (आरसा) ठेवू नयेत. दोन आरसे एकमेकांच्या समोरही लावू नयेत.
आजच्या या महागाईच्या काळात लोक कर्जात डुबत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे वा....
अधिक वाचा