ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाहन उद्योगातील अशोक लेलँडचीही काम बंद ची घोषणा

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाहन उद्योगातील अशोक लेलँडचीही काम बंद ची घोषणा

शहर : chennai

देशभरात ऑटो मोबाइल क्षेत्र मंदीच्या तडाख्याने पुर्णपणे कोलमडल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहन उद्योगातील मारुती सुजुकी, महिंद्र, टोयोटो आदि बड्या कंपन्यांनी कामगार कपात आणि कामाचे दिवस कमी करण्यास सुरवात केली आहे. त्यात आता हिंदुजा ग्रुपच्या अशोक लेलँड कंपनीची भर पडली आहे. या कंपनीनेही गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात कामाच्या दिवसात कपात केल्याने कामगारही चिंताग्रस्त झाले आहेत.

अशोक लेलँड प्रामुख्याने मध्यम आणि अवजड वाहनाची निर्मिती करते. या कंपनीचे अवजड वाहन निर्मितीचे देशभरात पाच प्लांट आहेत. त्या पाच ही प्लांटमध्ये या महिन्यासाठी काम बंद जाहीर करण्यात आले आहेत. त्यात उतराखंडतील पंत नगर प्लांटमध्ये 18 दिवस काम बंद , राजस्थानातील अल्वर येथील प्रकल्पात 16 दिवस , महाराष्ट्रातील भंडारा येथील प्लांटमध्ये 10 दिवस तामिळनाडूतील होसुर प्रकल्पात 2 दिवस काम बंद ठेवण्यात येणार आहे.

या कंपनीच्या अवजड वाहनाच्या देशांतर्गत मागणीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. तर सध्याच्या परिस्थितीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 45 टक्क्यांनी घट झाल्याने काम बंद करण्याची पाळी कंपनीवर आल्याचे सांगण्यात येते.

 

 

मागे

मंदीमुळे मारुती सुझुकीत 2 दिवस उत्पादन बंद
मंदीमुळे मारुती सुझुकीत 2 दिवस उत्पादन बंद

वाहन उद्योगात होत असलेल्या मंदीने अद्द्याप थांबायचे नाव घेतलेले नाही. वाहन....

अधिक वाचा

पुढे  

सोमवारपासून मोबाइल ग्राहकांसाठी ट्रायचे नवीन नियम
सोमवारपासून मोबाइल ग्राहकांसाठी ट्रायचे नवीन नियम

            नवी दिल्ली - सध्याच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहक....

Read more