By
Sudhir Shinde | प्रकाशित:
सप्टेंबर 04, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वाहन उद्योगात होत असलेल्या मंदीने अद्द्याप थांबायचे नाव घेतलेले नाही. वाहन उद्योगाची गेल्या दोन दशकातील ही सर्वात नीचांकी विक्री ह्या दरम्यान नोंदवली गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर 3000 हजार कंत्राटी कामगाराना कामावरून काढल्यावर आता दिनांक 7 ते 9 पर्यंत मारुती सुझूकीने दोन दिवस उत्पादन थांबविले आहे. सलग 9 महीने वाहन विक्री रोडावल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कमीत कमी झळ बसावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही बाजारात तेजी येत नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. “हरयाणातील गुरूग्राम आणि मानेसर येथील युनिटमधील दोन दिवस उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. 7 आणि 9 सप्टेंबरला दोन्ही ठिकाणी उत्पादन बंद राहिलं”, असे कंपनीने म्हटले आहे.
आता पर्यंत फोक्सवगण आणि हुंदई या कंपन्यांनी उत्पादन निर्मितीत कपात केली नाही. बोश कंपनीने महिन्याच्या सुरवातीला 13 दिवस प्रकल्प बंद राहील असे अगोदरच सांगितले होते.