By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - सध्याच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक आपला नंबर पोर्ट करत असल्याचं पहायला मिळत आहे. परंतु आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी वापरण्यात येणा-या जुन्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. तर नवीन नियमावली येत्या सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दिली आहे.
दरम्यान, नवीन नियमानुसार नंबर पोर्ट करण्यासाठी युनिक पोर्टिग कोड जनरेट करावा लागेल तसेच ग्राहकांचा नंबर पोर्ट करण्यासाठी आता तीन टप्पे पार करावे लागणार आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पार केल्यानंतर एकूण पाच दिवसांचा कालावधी नंबर पोर्ट करण्यासाठी लागणार असून त्यानंतर पूर्ववत सेवा सुरू होईल, असेही सांगण्यात आली आहे.
आता मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या प्रक्रियेत बदल केला असून यूनीक पोर्टिग कोड जनरेट करण्यासाठी प्रथम ग्राहकांचा नंबर पोर्ट करण्यास पात्र होणे आवश्यक असेल. त्यावर ट्रायने सादर केलेल्या पब्लिक नोटिसमध्ये ट्रायच्या नवीन नियमानुसार युनिक पोर्टिग जनरेट संदर्भात यूपीसीची नवीन अटी लागू केल्या गेल्या आहेत.
नवीन नियमावलीनुसार पोस्ट-पेड मोबाईल कनेक्शनसाठी पोर्ट करण्यास प्रथम नोंदणीकृत ग्राहकांचे उपलब्ध असलेले सर्व शिल्लक कनेक्शन संपविण्यात येणार आहेत. त्यानंतर पोस्ट-पेड नंबरसाठी जो ग्राहक एखाद्या कंपनीची कमीत कमी 90 दिवस सेवा वापरली आहे, त्याचे सर्व नियम व अटी पूर्ण करुनच दुसरी सेवा ग्राहकाला वापरता येणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या चुका आढळल्यास नंबर पोर्ट करताना समस्या निर्माण होवू शकतात.
देशभरात ऑटो मोबाइल क्षेत्र मंदीच्या तडाख्याने पुर्णपणे कोलमडल्याचे दिसत ....
अधिक वाचा