By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 12:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅ प व्हॉट्सअॅाप अलीकडे जास्तच चर्चेत असल्याचे दिसते आहे. सातत्याने नवनवे फीचर्स आणणारी कंपनी सदया तीन नवे फीचर्स घेवून आली आहे व त्यामुळे व्हॉट्सअॅीपचा वापर करताना काही मोठे बदल जाणवतील. नव्या अपडेटमध्ये पहिलं फीचर ग्रुपमध्ये अॅहड करण्यासंदर्भात आहे आहे तर दुसरं फीचर रिमाइंडर आणि तिसरं फीचर कॉल वेटिंगशी निगडीत आहे.
ग्रुप इनव्हाइट पहिल्या फीचर मध्ये WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी पर्याय निवडल्यानंतर ग्रुप्स हा पर्याय निवडावा. त्यात तुम्हाला Who can add me to groups (ग्रुपमध्ये कोणी अॅाड करावं) हा पर्याय दिसेल. येथे तुम्ही Everyone, my contacts आणि my contacts except यापैकी एक पर्याय निवडू शकतात.
तसेच दुस-या म्हणजेच रिमाइंडर फीचर मध्ये WhatsApp मध्ये आता तुम्हाला आवश्यक कामांचं रिमाइंडर मिळेल. या फीचरद्वारे युजर्सला कोणतीही टास्क सेट करता येईल. या टास्कबाबत तुम्हाला रिमाइंडर मिळेल. तुम्हाला एका थर्ड पार्टी अॅटपद्वारे व्हॉट्सअॅळपवरच महत्त्वाच्या कामाचे Reminder मिळतील. यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Any.do हे अॅेप असणं आवश्यक आहे. हे अॅीप WhatsApp अकाउंटशी जोडावं लागेल. तुम्ही सेट केलेलं रिमाइंडर कोणत्याही व्हॉट्सअॅाप कॉन्टॅक्टला फॉरवर्ड देखील करता येणार आहे. मोबाइलमध्ये काहीही ‘टास्क क्रिएट’ केल्यास तुम्हाला रिमाइंडर हवंय की नाही याबाबत विचारणा केली जाईल. त्यानंतर ठरवलेल्या वेळेवर तुम्हाला WhatsApp द्वारे रिमाइंडर मिळेल. मात्र हे अॅवप मोफत नाहीये, यासाठी Any.do चं प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.
तर तिस-या आणि शेवटच्या म्हणजे कॉल वेटिंग फीचर मध्ये युजर कोणताही कॉल मिस करणार नाहीत. आता युजर्सना WhatsApp कॉल दरम्यानच कॉल वेटिंग नोटिफिकेशन मिळेल. हे फीचर व्हिडिओ कॉलिंगसाठीही वापरता येईल. व्हॉट्सअॅुपने व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) ही सेवा सुरू केली असून यामुळे अँड्रॉइड वापरकर्ते आता सामान्य मोबाइल कॉलप्रमाणे व्हॉट्सअॅ पवरही वेटिंग कॉल पाहू शकणार आहेत.
दरम्यान, प्ले स्टोरवर आता व्हॉट्सअॅेप अपडेट केलं तर हे नवं फीचर युजर्सला वापरता येणार आहे. कॉल वेटिंग हे फीचर व्हॉट्सअॅंपच्या v2.19.352 किंवा यावरील व्हर्जनवर उपलब्ध आहे. व्हॉइस कॉलिंगसह व्हिडिओ कॉलिंगसाठीही या फीचरचा वापर करता येणार आहे. याआधी व्हॉट्सअॅिप कॉलवर जर तुम्ही इतरांसोबत बोलत असाल तर दुसरा कोणाचा कॉल येतोय हे कळत नव्हतं. पण, आता दुसरा कॉल वेटींगवर असल्याचं दिसेल.
नवी दिल्ली - सध्याच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहक....
अधिक वाचा