ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण

पोस्ट :  डिसेंबर 25, 2019 03:41 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५४ पासून हा पुरस्कार देशासाठी योगासन देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. पहिल्या लेखात १९५४ मध्ये प्रथमच ज्यांना हा भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते डॉ. चद्रशेखर वेंकटरमण  यांची थोडक्यात माहिती देत आहोत!

 

 

       डॉ. चद्रशेखर वेंकटरमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील त्रिश्नापल्ली नगराच्या जवळील तिरुवणिइक्कवल नामक गावात एका अय्यर परिवारात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती अम्मल व वडिलांचे नाव श्री. रामनाथन चंद्रशेखर अय्यर होते. वडील तेथील शाळत शिक्षक होते. त्यांच्या पूर्वजांची शेती-वाडी आणि जमीनदारी तंजौर जिल्ह्यातील अय्यमपेट जवळील एका गावात होती. 

 

        त्याचे सर्वच कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत होते. शिक्षणासाठी तळमळणारे होते. हीच तळमळ, साहस आणि निष्ठा रमणना वारसाहक्काने मिळाली होती. त्याच्या जन्मानंतर तीनच वर्षांनी वडिलांना विशाखापट्टणमच्या मिसेस ए. वी. एनम कॉलेजमध्ये गणित व भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाल्याने त्यांचे सर्व कुटुंब विशाखापट्टणमला राहायला आले.

 

      विद्यार्थी रमणला बालवयापासून अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचे वरदान होते. म्हणूनच वयाच्या केवळ १२ व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा अतिशय उत्तम गुणांनी तो उत्तीर्ण झाला. त्याच काळात श्रीमती अॅनी बेझंट अमेरिकेहून भारतात परतल्या होत्या. तेव्हा त्यांच्या धार्मिक भाषणांचा रमणच्या मनावर अतिशय खोल परिणाम झाला आणि त्याने एफ. ए. मध्ये विज्ञान विषयच सोडून दिला. तेव्हाही तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. नंतर मात्र श्री. रमण यांनी बी. एस्. सी. ला भौतिक विज्ञान व गणित आदी विषय घेतले. मग सर्वांना सांगूनच टाकले की, "विज्ञानाव्यतिरिक्त दुसरा कोणताही विषय घेणार नाही.” विज्ञानाची एवढी आवड होती की बी. एस. सी. च्या संपूर्ण वर्षात जेवढे प्रयोग व प्रात्यक्षिक करायची होती, ती सर्व आणि शिवाय पुढचीसुद्धा काही दिवसातच पूर्ण केली मग आता काय करायचं?' प्रश्न मनात नाचू लागला. डोक्यात चलबिचल सम झाली. शेवटी प्राचार्य नानासाहेब यांच्या लक्षात ही गोष्ट आली. तेव्हा त्यांनी श्री. रमण यांच्यावरील पाठ्यक्रमासंबंधी सर्व बंधने काढून टाकली. शिवाय नवीन प्रयोग-प्रात्यक्षिके करण्याचीही संधी उपलब्ध करून दिली. फलस्वरूप रमण संपूर्ण विश्वविद्यालयात बी. एस. सी. मध्ये सर्वप्रथम आले आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे हे एकमात्र विद्यार्थी होते.

 

         यानंतर एम. एस. सी. मध्येही त्यांना अभ्यासक्रमाच्या बंधनामधून मुक्त करण्यात आले. कारण त्यांचे प्रयोग-परीक्षणं, नवीन पुस्तकांचा अभ्यास चोवीस तास चालूच होता. याच काळात रमणनी ध्वनीसंबंधी एक विशेष संशोधन केले. त्यामुळे त्या। काळातील विशेषज्ज्ञ श्री. जोन्ससाहेब व लॉर्ड रेले हे खूपच प्रभावित झाले. त्यांचा तो लेख लंडनच्या 'फिलॉसॉफिकल मॅगेझिन' मध्ये नोव्हेंबर १९०६ च्या अंकात प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचा 'प्रिझम' संबंधीचा आणखी एक लेख लंडनची प्रसिद्ध विज्ञान पत्रिका 'नेचर'मध्ये प्रकाशित झाला. याप्रमाणे रमणनी विद्यार्थी जीवनातच देशाबरोबर परदेशातही आपल्या वैज्ञानिक प्रतिभेची मोहर उमटवली होती.

 

        आता त्यांना इंग्लंडला जाऊन भौतिक विज्ञानात पुढे संशोधन करण्याची जबरदस्त इच्छा होती. त्यासाठी त्यांचे आप्त-स्वकीय व प्रोफेसर यांनी प्रयत्न केले; आणि तसेच सरकारी अधिकाऱ्यांनीसुद्धा शिष्यवृत्ती देऊ केली. वैद्यकीय दाखलाही आवश्यक होता; पण डॉक्टरी तपासणीत त्यांच्या नाजूक प्रकृतीने सहकार्य नाकारले. समुद्री प्रवास व इंग्लंडची थंड हवा त्यांचे शरीर सहन करू शकणार नाही; म्हणून डॉक्टरी प्रमाणपत्र त्यांना मिळाले नाही.

 

        नंतर वित्त विभागाच्या निवड परीक्षेत उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन त्यांना त्यातही प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यांची वित्त विभागात 'उपमहालेखागार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा कलकत्याला ते राहू लागले. एकदा कामावरून घरी परतत असताना बाजाराच्या रस्त्यावर 'विज्ञानाच्या अनशीलनार्थ भारतीय संस्थान अशी एक पाटी लावलेली त्यांनी पाहिली. ताबडतोब ते तिथे पोहोचले. दरवाजा वाजविल्यावर श्री. आशुतोष डे यांनी दार उघडले. आतमध्ये एक मोड़ी संशोधनासाठी तयार होती. रमणना परमानद झाला. त्यांच्या डोळ्यांत पाटन आशुतोष डेनी त्यांची भेट त्या संस्थचे मत्री श्री. अमृतलाल सरकार यांच्याशी घालून दिली. श्री. सरकार तर अशाच विद्यार्थ्याच्या शोधात होते. अपेक्षा समाधानाच्या आनंदात त्या प्रयोगशाळच्या चाव्याच त्यानी रमण यांच्या हातात सोपविल्या. त्याचा पुरेपूर वापर श्री. रमण यांनी सुरू केला. पहाटे साडेपाच वाजता प्रयोगशाळेत पोहोचायचे. तेथून पावणेदहा वाजता परतायचे. नंतर नित्यकर्म, जेवणखाण उरकून ऑफिसमध्ये जायचे. तिथले कर्तव्य प्रामाणिकपणे करून तिथून सरळ प्रयोगशाळेत जाऊन ठिय्या मारायचा आणि रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत घरी परतायचे. इतक्या काटेकोर जीवनक्रमामध्ये त्यांनी भरपूर संशोधन केले. ज्यामुळे देशविदेशांत मान्यवरांमध्ये त्यांचे संशाधन पसरले. त्यांची ख्याती सर्वदूर झाली.

 

       साहजिकच आहे की, असा मोठेपणा ज्यांना मिळतो त्यांच्यावर जळणारी स्वार्थी, मत्सरी माणसे आजूबाजूला असतातच. त्यांनी प्रामाणिकपणे आपली ड्यूटी सांभाळून इतर वेळात संशोधनाचे काम केले होते; तरीही विघ्नसंतोषींनी त्यांचे काम असमाधानकारक असल्याच्या तक्रारी केल्याच. त्यामुळे त्यांची बदली रंगूनला केली गेली. तिकडे त्यांना वैज्ञानिक प्रयोग करता येत नव्हते तरीही त्यांनी वैज्ञानिक पुस्तकांचा अभ्यास चालूच ठेवला. त्यातच वडिलांच्या निधनाची बातमी आली. म्हणून ते रंगूनहून मद्रासला परतले. तिथे प्रेसिडेंसी कॉलेजच्या प्रयोगशाळेत त्यांचे संशोधन चालू राहिले. इकडे त्यांच्या कार्यालयीन कामाची विभागीय चौकशी केली गेली. त्यात निष्पन्न झाले, की यांचे ऑफिसचे काम अत्यंत परिपूर्ण व वेळच्या वेळी केले जाणारे होते. साहजिकच मग सन १९११ मध्ये 'महालेखागार' म्हणून नियुक्ती होऊन ते कलकत्त्याला कामावर रुजू झाले.

 

       आता इथे पुन्हा भरपूर नवनवीन प्रयोग आणि ग्रंथलेखन होत राहिले. यामुळे अत्यंत प्रभावित होऊन कलकत्ता विश्वविद्यालयाचे उपकुलपती श्री. आशुतोष मुखर्जी यांनी एका नव्या उघडलेल्या सायन्स कॉलेजमध्ये श्री. रमण यांना फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून आमंत्रित केले; पण ते साशंक होते की, एवढी उच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून ते कसे येतील? पण उलट अत्यंत उत्साहाने त्यांनी ही भौतिक विषयाची प्रोफेसरकी स्वीकारली. कारण तेच तर त्यांचं खरंखुरं पॅशन होतं! तेव्हा इ.स.१९१७ पासून श्री. रमण कलकत्ता विश्वविद्यालयात पो प्रोफेसर म्हणून काम करू लागले. आता सर्व भारतातले विद्यार्थी त्यांच्याकर आकर्षिले गेले. श्री. रमण यांची आपल्या कामाप्रती असलली तळमळ आणि त्यांची असलेली प्रतिभा पाहून त्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आचीवाल्ट म्हणून गेले की, “विश्वविद्यालयाची शोभा ही उत्तुंग आणि आलिशान इमारली नसून, तेथील गुरू-शिष्य परंपरा आहे."

 

     इ. स. १९२१ मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रमंडल विश्वविद्यालयाच्या एका सभेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रा. रमण यांना इंग्लंडला पाठविले गेले. तिथे त्यांनी आपले संशोधनपर विचार माडून जगभराच्या वैज्ञानिकांवर। चांगलाच ठसा उमटविला. या भारत-युरोप समुद्री प्रवासादरम्यान जहाज भूमध्य सागरावरून जात असताना डेकवर उभे राहून त्यांनी अथांग जलराशीला नीलमण्याच्या कांतीसमान नजरेत साठविले. मूलभूत प्रश्न मनात निर्माण झाला, 'पाण्याचा रंग निळा का?' झाले...! सात वर्षे याच विषयावर संशोधन होत राहिले. जेव्हा इ. स. १९२८ मध्ये त्यांनी आपले हे संशोधन जगासमोर प्रकाशित केले, तेव्हा संपूर्ण विज्ञान जगतात एकच खळबळ उडाली आणि कित्येक अज्ञात प्रश्नांची उत्तरे मिळाली.

 

      इंद्रधनुष्याचे रंग हा प्रकाशकिरणांचा एक महान चमत्कार आहे. डॉ. रमण यांच्या संशोधनाचा मुख्य विषय 'प्रकाश' हाच होता. प्रकाशकिरणांचे पसरणे, तरल, पारदर्शक व स्फटिकासारख्या पदार्थांमधून आरपार जाणे, नाना रंग दाखवणे वा एकाच रंगात सम्मिलित होणे, त्यातून मूळ रंगाचे ज्ञान होणे म्हणजेच प्रकाशकिरणांच्या गुणधर्माचे संशोधन व विवेचन हाच त्यांचा मुख्य विषय होता. यातूनच अणू सिद्धान्त अधिक सुलभ झाला आणि अणूंची गणना करणे शक्य झाले. हेच संशोधन 'रमण इफेक्ट' या नावाने मान्यता पावले आहे. यालाच भौतिक विज्ञानातील 'नोबेल पुरस्कार' इ. स. १९३० मध्ये मिळाला. आशिया खंडात भौतिक विज्ञानात मिळालेला हा पहिला पुरस्कार होता. याचबरोबर प्रो. रमणनी ध्वनिविज्ञानाशी संबंधितही अनेक सिद्धान्त प्रतिपादित केले आहेत.

 

       डॉ. रमण यांच्या संशोधनाने विश्वकल्याणात भरच पडली आहे. याची जाण ठेवून रशियन सरकारने इ. स. १९५७ मध्ये त्यांना 'लेनिन पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच इतर देशांनीही डॉ. रमण यांचा आपापल्या पुरस्काराने सन्मान करून त्यांच्या वैश्विक कार्याची योग्य अशी टावर मृत्यूपूर्वी काहीच वर्षे आधी त्यांनी डोळ्यांमधील 'रेटिना संबंधी विशेष संशोधन केले; जे भौतिक विज्ञान, शरीर विज्ञान आणि मानवी मेंदू या तीन संपूर्ण वेगळ्या विषयांना एकाच वेळी स्पर्श करत होते. याद्वारे त्यांनी सांगितले की, डोळा व कॅमेरा यांची तुलना संभ्रम निर्माण करणारी आहे. मनुष्य स्वतः त्याच्या डोळ्याच्या रेटिनाचे चित्र पाहू शकतो आणि स्वतःचा डोळा कसा काम करतो हेही बघू शकतो.

 

       डॉ. रमणना बालवयात वाद्यांची आवड होती. त्यातही त्यांनी संशोधन केले होते. शिवाय फुलांवर प्रेम करणारा हा शास्त्रज्ञ त्यांच्या रंगांविषयीही तितकाच संशोधक होता. इ. स. १९३३ मध्ये बंगलोरच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'ची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर ते बंगलोरचेच झाले. तिथेच त्यांनी 'रमण संशोधन संस्थे'ची स्थापना केली. तिचे ते संस्थापक-संचालक होते. 

 

          शेवटपर्यंत डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण हे कर्मरत, कृतिशील व संयमी जीवन जगत होते. सन १९५४ मध्ये भारत सरकारने 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. असे जीवनसाफल्याचे समाधान सोबत घेऊन हा भारताचा महान वैज्ञानिक नरोत्तम दि. २१ नोव्हेंबर १९७० रोजी स्वर्गवासी झाला.