‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - मरुदूर गोपालन रामचंद्रन
पोस्ट : जानेवारी 15, 2020 08:05 PM
‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९८८ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते मरुदूर गोपालन रामचंद्रन यांची थोडक्यात माहिती.
मरूदूर गोपालन रामचंद्रन म्हणजेच एम. जी. आर. किंवा एम. जी. रामचंद्रन दि. १७ जानेवारी १९१७ रोजी श्रीलंकेच्या कँडी शहरात एका की कुटंबात झाला. त्यांचे वडील श्री. गोपालन मेनन हे तिथे मॅजिस्ट्रेट होते. ते लहान असतानाच वडील वारले. म्हणून आई सत्यभामा व भाऊ एम. जी. कपाणी यांना घेऊन भारतात तमिळनाडूमधील कुंभकोणम येथे ते राहण्यास आले. त्या वेळी गरिबीमुळे इयत्ता तिसरीत असलेल्या सात वर्षांच्या रामचंद्रनला शोळा सोडून पोटापाण्यासाठी एम. कण्डा स्वामी पिल्लई यांच्या ड्रामा कंपनीत काम करावे लागले. जवळजवळ दहा वर्षं या नाटक कंपनीत साऱ्या देशात व बाहेर बर्मापर्यंत फिरता आले. त्यातच अभिनयही करत गेले आणि रिकाम्या वेळात पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवत राहिले.
लहान वयातली गरिबी ते कधीच विसरले नाहीत आणि त्यामुळेच गरीब व दीनदुबळ्यांचे कैवारी आणि दिलदार झाले. वयाच्या सातव्या वर्षी 'मदुरै ओरिजनल बॉय कंपनी'मध्ये अभिनय करून पैसे कमवायला सुरुवात केली. सुदर, सुडौल आणि सडपातळ शरीरयष्टीमुळे स्त्री पात्राची व्यक्तिरेखा त्यांना सहज मिळत गेली. इ. स. १९३० मध्ये 'सती लीलावती'मध्ये पोलिसाच्या नामकत रजतपटावर झळकण्याची संधी त्यांना मिळाली. इ. स. १९५४ मध्ये मालकल्लन' नावाच्या फिल्ममध्ये गरीब व दलितांची सेवा करणाऱ्या सम नायकाची भूमिका मिळाली. यानंतर अशा योगी, नाडोडी मन्नम, एंग वीटू पिल मका मिळाली. यानंतर अशाच प्रकारचे चित्रपट त्यांनी केले. 'मर्म मन्नम, एंग वीटू पिल्लै' अशा सिनेमांमधून दलिताचा कैवारी, दुबळ्यांचा साहाय्यक, दुष्ट जमीनदारांचा हाडवैरी या भूमिकांनी समस्त तमिल प्रेक्षकांना जिंकून घेतले. एम. जी. आर. तरुणांचा आदर्श झाला. सर्व पुरुषवर्ग त्यांची प्रशंसा व आदर करू लागला आणि स्त्रिया त्यांच्या भक्त झाल्या तमिळ जनतेच्या मनात एकच भावना रुजली की जर कोणी गरिबी, शोषा भ्रष्टाचारापासून मुक्ती देणार असेल तर तो फक्त एम. जी. आर. च!
जनमानसातली हीच भावना रामचंद्रन यांच्याही मनात उतरली. कर गरिबीचे चटके त्यांनी स्वतः लहानपणापासून अनुभवले होते. म्हणून शेक समाजसेवेसाठीच त्यांनी इ. स. १९५३ मध्ये 'द्रविड मुन्नेट कळघम'मध्ये प्रवेश केला. एम. जी. रामचंद्रन केवळ एक लोकप्रिय हिरो आणि जनतेचे उदारमतवादी नेताच नव्हते; तर एक चतुर राजनीतिज्ञ होते, कुशल राजकारणी होते. म्हणन वेळेचं महत्त्व ओळखून त्यांनी खरंखुरं राजकारण खेळलं. आवश्यक तेव्हा यती केली. गरजेनुसार विभक्तही झाले. त्यामुळेच इ. स. १९७२ मध्ये जेव्हा करुणानिधींबरोबर मतभेद झाले; त्या वेळी त्यांनी स्वत:चा नवीन पक्षच बनवला. त्याला 'अन्ना द्रविड मुनेत्र कषगम' हे नाव दिले. पार्टीचा झेंडा डी. एम. के.चाच (द्रविड मुनेत्र कषगम) ठेवला; पण त्यावर अण्णादुराईंचे चित्र ठेवले. नंतर त्याच नाव 'अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट कळघम' (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेट् कळघम) झाले.
शेवटी एक दिवस असा आला की सिनेमामध्ये गरीब, असहाय, निर्बलांची बाजू घेऊन लढणारा नायक, त्यांना न्याय मिळवून देणारा नायक-हिरो एम. जी. आर. यांनी तमिळनाडूच्या जनतेला राज्यामधला खराखुरा भ्रष्टाचार निपटून काढण्याचे वचन दिले. त्या वेळी इ. स. १९७७ मध्ये ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले होते. तमिळनाडूमधल्या भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी भारताचे त्या वेळचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्याकडे मागणी केली होती. भारत सरकारने त्यासाठी कमिशनची नियुक्ती केली होती.
एम. जी. रामचंद्रन यांनी आपल्या शासनकाळात 'गरीब मुलांना बूट, कपडे, दंतमंजन देऊन शिवाय राज्यातील ५० लाख मुलांच्या दुपारच्या जेवणाची साया करून दिली. त्यासाठी राज्यावर दोनशे कोटी रुपयांच्या खर्चाचा भार पडला. एम. जी आर. यांची राजनैतिक प्रणाली अत्यंत वैयक्तिक व सामता प्रकारची होती. म्हणून त्यांच्या शासकीय अधिकारी वर्गाच्या नैतिकतेवर वाईट झाला होता. एम. जी. रामचद्रन आय. ए. एस. अधिकाऱ्यांना सर्वांसमक्ष खत असत. झिडकारत असत. याच कारणामुळे त्यांच्या शासनकाळात शासकीय अधिकाऱ्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. याच मात काही अशी प्रश्नचिन्ह त्याच्यावर लागली होती, की ज्यामुळे त्यांच्या तिमेला काहीसा कलंक लागला. पण तरीही १० फेब्रुवारी १९८५ ला ते तिसऱ्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.
रामचंद्रन त्यांच्या मंत्रिमंडळात खूपच लोकप्रिय होते. त्यांना मूत्रपिंडाचा वास होता. त्याची पत्नी, एकेकाळची त्याची हिराईन, व्ही. एन. जानकी, हिने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. ५ ऑक्टोबर १९८४ ला अचानक श्वसनाच्या आजारामुळे अपोलो हॉस्पिटलमध्ये व नंतर न्यूयॉर्कच्या ब्रुमहिन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचारानंतर त्यांनी मृत्यूवर मात केली व पुन्हा तिसऱ्यांदा तमिळनाडूचे पुढारी मुख्यमंत्री झाले. आजारपणामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचे ठरवले. पण अनेक मंत्र्यांनीही राजीनामा सादर केला. म्हणून नाइलाजाने रामचंद्रनना आपला विचार बदलून राजीनामा मागे घ्यावा लागला.
दि. २२ डिसेंबर १९८७ ला कत्थिपारा येथे सार्वजनिक सभा आयोजित केली होती. तिथे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीही उपस्थित होते. या सभेत भाग घेण्यामुळे ते खूप थकून गेले होते. शेवटी २४ डिसेंबर १९८७ ला प्रात: ३ वाजता हा दिलदार नायक अनंतात विलीन झाला. यांच्या मृत्यूमुळे तामिळनाडूची जनता दुःखात चूर झाली, शोकसागरात बुडून गेली. त्यांच्या सहचर, अनुयायांना एवढा धक्का बसला की काही जणांनी आत्महत्याही केल्या. खरोखरच एम. जी. 'रामचंद्रन यांच्या जीवनचरित्रात एक अशी महानता, औदार्य, दीन-दुबळ्यांसाठी प्रेम लपलेले होते जे दुर्लभ होते. इ. स. १९८८ मध्ये भारत सरकारने, मरुदूर गोपालन रामचंद्रन यांना तमिळनाडूच्या व देशाच्या केलेल्या सेवेसाठी मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरविले.
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - सत्यजीत राय
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - राजीव गांधी
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - सरदार वल्लभभाई पटेल
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - मोरारजी देसाई
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - नेल्सन मंडेला
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. भीमराव आंबेडकर
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - मरुदूर गोपालन रामचंद्रन
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - खान अब्दुल गफार खान
Maecenas vitae mollis risus. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Nunc egestas eget eros iaculis porta. Nulla nisl eros, imperdiet sit amet elementum quis, fermentum non sapien.
Praesent vitae fermentum lacus. Ut suscipit velit porta dui egestas adipiscing. Maecenas pellentesque, lectus at volutpat laoreet, mi elit cursus metus, at fermentum risus neque ut sem. Ut sapien tortor, vestibulum at nibh a, posuere convallis magna.
Mauris dictum, purus non commodo tincidunt, diam turpis mattis leo, id aliquet leo tellus at urna. In placerat pretium magna, nec egestas sapien feugiat vel. Sed ipsum odio, condimentum nec hendrerit feugiat, convallis et dui.
Etiam tempus magna facilisis, faucibus est placerat, egestas turpis. Maecenas vitae mollis risus. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos.
Maecenas dui nibh, dignissim ac ultricies nec, pulvinar in ipsum. Nunc egestas eget eros iaculis porta.