ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - राजीव गांधी

पोस्ट :  जानेवारी 22, 2020 07:35 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९९१  मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते राजीव गांधी यांची थोडक्यात माहिती.

 

       राजीव गांधींचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईच्या शिरोडकर नमिल होममध्ये झाला. त्या वेळी नेहरूजी स्वातंत्र्य चळवळीत होते. म्हणून इंदिरा गांधी त्यांच्या आत्या कृष्णा हरीसिंग यांच्या मुंबईच्या घरी राहिल्या होत्या. त्यांचे पती फिरोज गांधीसुद्धा मुंबईतच होते. आजी कमला नेहरूच्या नावानुरूप नातवाचे नाव असावे, या नेहरूंच्या इच्छेवरून मुलाचे नाव 'राजीवरत्न' गांधी ठेवले गेले. ऑगस्ट १९४७ पर्यंत इंदिराजी फिरोज गांधींबरोबर लखनौला राहिल्या. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरू पंतप्रधान झाल्यावर, त्या तीन मूर्ती भवनमध्ये, सर्व व्यवस्थापनासाठी राजीव व संजय या दोन्ही मुलांसह पं. नेहरूंबरोबर राहिल्या. वयाच्या सहाव्या वर्षी राजीवना दिल्लीच्या 'सेंट कोलंबस स्कूलमध्ये' घातले. 


       इ. स. १९५५ मध्ये राजीवना डून स्कूलमध्ये घातले. राजीवनी कधीही शाळेत शिस्तभंग केला नाही. सन १९६० मध्ये राजीवनी सीनिअर केंब्रिज पास केले. त्याच वेळी ९ सप्टेंबर १९६० रोजी फिरोज गांधींना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सीनिअर केंब्रिजनंतर राजीवना इंग्लंडला शिकायला ठेवले. तिथे खर्च चालवण्यासाठी सुट्टीमध्ये राजीव काम करत असत. लहानपणापासूनच त्यांचे पायलट बनण्याचे स्वप्न होते. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे प्रशिक्षण राजीवनी सुरू केले. याच काळात राजीवजींची सोनिया माइनो यांच्याशी भेट झाली. दोघानीही एकमेकांना पसंत केले. नंतर घरच्यांच्या संमतीने दि. २५ फेब्रुवारी १९६८ राजा दोघांचा विवाह झाला.


         राजीवजी २० वर्षांचे असताना २७ मे १९६४ रोजी पं. नेहरूंचे निधन होते. लाल बहादूर शास्त्री पतप्रधान झाले होते व इंदिरा गांधी सचना व प्रसार मंत्री बनल्या होत्या. जानेवारी १९८० मध्ये मध्यावधी निवडणुका होऊन इंदिराजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनवले गेले. इ. स. १९८० मध्ये संजय गांधी विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर राजीवनी राजकारणात यावे म्हणून  सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकला गेला. शेवटी १७ ऑगस्ट १९८२ रोजी राजीवनी संसद सदस्य म्हणून निवड झाल्यावर संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. पण थोड्याच काळात ऑपरेशन ब्लू स्टारमुळे नाराज असलेल्यांनी, सुरक्षारक्षकांकरवी, दि. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिराजींची हत्या केली. दिवशी राजीव गांधींना लोकसभेमध्ये काँग्रेस दलाचा नेता म्हणून निवडले गेले आणि ते देशाचे पंतप्रधान झाले.


         त्या वेळी युवा पंतप्रधान राजीवनी देशाला एकविसाव्या शतकाकडे नेण्यासाठी कंबर कसली. देशोत्थानाचे कार्यक्रम, नवीन विज्ञानप्रणाली सुरू केली. कॉम्प्युटरचा वापर, उपयोग, उत्पादन व निर्यातही सुरू झाली. समाजकल्याण कार्य, ग्रामीण उद्योगधंदे सुरू केले. मागास वर्गाकडे विशेष लक्ष पुरवले. दि. १६ सप्टेंबर १९८६ ला निकारागुआचे राष्ट्रपती डॅनियल ओटेंगा यांनी दिल्लीला येऊन आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'दि अगस्टो सीजर सॉन्डिनो ऑर्डर' त्यांना प्रदान केला. राजीवनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांत संबंध वाढविणे आणि विश्वशांतीच्या दृष्टीने प्रयत्न केले. परिणामत: इ. स. १९८५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघ समारंभात झालेल्या कॉन्फरन्समध्ये 'बिआँड वॉर अॅवॉर्ड' देऊन राजीवजींचा सन्मान केला. राजीवजींना शेजारच्या देशांशी बंधुत्वाचे संबंध हवे होते. म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनजीर भुट्टोंच्याबरोबर भेट घेऊन भारत-पाकिस्तानमध्ये असलेले तणावपूर्ण संबंध कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे श्रीलंकेमधला लिट्टेचा आतंकवाद संपवण्याच्या दृष्टीने तेथील राष्ट्रपती जयवर्धने यांच्या आवाहनानुसार भारतीय सैन्य पाठविले. पण हाच निर्णय त्यांच्या जिवावर बेतला. १९ फेब्रुवारी १९८१ च्या दिल्ली येथील बोट क्लबवर राजीवजींनी किसान रॅलीचे आयोजन केले होते. यासाठी सुमारे ५० लाखांची उपस्थिती होती असे म्हणतात.


     'राजीवजींनी विमानसेवेचा राजीनामा देऊन लखनौच्या अमेठी लोकसभा क्षेत्रात निवडणुकीसाठी नामांकन पत्र भरले. १७ जून १९८१ ला बहुमताने निवडून येऊन लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. आता त्यांनी राजकारणात सक्रीय भाग घेतला. २८ जूनला चीनच्या विदेशमंत्र्यांच्या निमंत्रणावरून देशाचा दौरा केला. ब्रिटनच्या युवराज चार्ल्सच्या विवाहाला उपस्थित राहण्यास २८ जुलै रोजी ब्रिटनचा दौरा केला. काँग्रेसचे (इं) महासचिव राजीव गां झाले. त्या वेळी काँग्रेसमध्ये अनेक सुधारणा केल्या. उत्तर प्रदेशात कित्येक वा चालत आलेला नेतृत्वाचा विवाद समाप्त केला. बंगलोरमधल्या युवा काँग्रेसच्या अधिवेशनात राजीवजींना नेता म्हणून निवडले.


         ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने सकाळी ९ वाजता केली. तेव्हा राजीवजी प्रणव मुखर्जीबरोबर बंगालच्या दौऱ्यावर होते. ते त्वरित परतले. तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राजीवजींना पंतप्रधानपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. १२ नोव्हेंबर १९८४ ला पंतप्रधान राजीव गांधींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. 


         ४० वर्षाचे तरुण पंतप्रधान भारताला मिळाले होते. एका नव्या युगाची ही सुरुवात होती. त्यांनी ताबडतोब १९८४ मध्ये आठव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणूक प्रचारासाठी तुफानी वेगाने भारतभर दौरा केला. मागील सर्व निवडणुकांच्या तुलनेत प्रचंड बहुमताने जनतेने राजीवजींना पंतप्रधानपदावर बसविले. पंतप्रधान झाल्यावर सर्व भारतीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजीव गांधींनी संपूर्ण भारतदर्शन कार्यक्रम आयोजिला. १२ जुलै १९८५ ला मध्य प्रदेशातील झाबुआ नामक एका सामान्य गावातून हा दौरा सुरू केला. नंतर ओरिसा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, लक्षद्वीप, अरुणाचल व मिझोरामपर्यंत सर्व राज्ये पादाक्रांत केली. या यात्रेत हेलिकॉप्टरपासून लहान-मोठ्या सर्व साधनांचा वापर केला. पायीसुद्धा प्रवास केला. या प्रवासात त्यांच्याबरोबर सोनिया गांधी व सरकारी साहाय्यक आणि स्थानिय अधिकारी होते.


         जुलै १९८३ ते मे १९८७ या काळात श्रीलंकेत चालू असलेल्या रक्तराज लढ्यामुळे सुमारे १५ लाख शरणार्थी भारतात आश्रयाला आले. त्या वेळा २० जुलै १९८७ ला कोलंबो येथे राष्ट्रपती जयवर्धने व राजीव गांधी यांच्यात कपडौता-करार होऊन त्यावर सह्या झाल्या आणि भारत-श्रीलंका यांच्यातील गैरसमज दूर झाले. दसऱ्या दिवशी ३० जुलै १९८७ रोजी भारतात परत येताना कोलंबो विमानतळावर राजीवजींच्या सन्मानार्थ नौसैनिकांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देताना एका नौसैनिकाने त्यांच्यावर घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो विफल झाला. त्यातून पंतप्रधान राजीव गांधी वाचले. या आधीही २ ऑक्टोबर १९८६ रोजी म. गांधींच्या समाधीदर्शनाला गेले होते तेव्हा झाडीतून आलेल्या बंदुकीच्या गोळीने त्यांचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. पण तोही फसला व हल्लेखोर पकडला गेला.


        यानंतर बोफोर्स-दलाली प्रकरणात विश्वनाथ प्रतापसिंग राजकीय मंचावर प्रकटले. तेव्हा राजीव गांधींच्या प्रतिमेला विश्वस्तरावर तडा गेला. नवव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस (इं.) चा पराजय झाला. त्यानंतर राजकीय पटलावर अशी चक्रे फिरली की लोकसभा दुभंगली. पुन्हा निवडणुकीच्या घोषणा झाल्या. या वेळी निवडणूक प्रचारासाठी राजीव गांधी दि. २१ मे १९९१ रोजी पैरुम्बुदूर नामक दक्षिणेच्या एका लहानशा गावात पोहोचले. तिथे आधीच हजर असलेल्या लिट्टेच्या आत्मघाती दलातील लोकांनी राजीव गांधींची हत्या केली. भारताच्या तरुण युवा पंतप्रधानाचा अंत झाला.

 

       दि. ७ जुलै १९९१ रोजी भारत सरकारने राजीव गांधींना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन गौरविले. नंतर मे १९९२ मध्ये 'इंदिरा गांधी शांती, निरस्त्रीकरण आणि विकास-९१ पुरस्कार' देऊनही राजीवजींचा सन्मान केला गेला.