ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 05:24 PM



कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज  लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. उंबरवाडी गावचे रहिवासी असलेले जोतिबा चौगुले हे जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये रविवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी 'अमर रहे, अमर रहे, जोतिबा चौगुले अमर रहे', अशा घोषणा देण्यात आल्या.

         जवान जोतिबा चौगुले यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या गावातील लोकांनी चौगुले यांना आलेल्या वीरमरणाचा अभिमान व्यक्त केला. याशिवाय गावातल्या तरुणांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही केला.

       चौगुले यांना आदरांजली वाहण्यासाठी महागाव आणि उंबरवाडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. महागावाची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून चौगुलेंना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, चौगुलेंच्या अंत्ययात्रेसाठी शाळेतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले  होते.

    शहीद जोतिबा चौगुले हे सन २००९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. ते जम्मूमधील राजुरी येथील सीमेवर तैनात होते. सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.