ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - खान अब्दुल गफार खान

पोस्ट :  जानेवारी 14, 2020 07:52 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९८७ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते खान अब्दुल गफार खान यांची थोडक्यात माहिती. 

 

      दि. ६ फेब्रुवारी १८९० रोजी पश्चिमोत्तर सीमान्तच्या हस्तनगर (अष्टनगर) च्या उतमानजई गावात खान अब्दुल गफार खान यांचा जन्म झाला. या अब्दुल गफार खानना पठाण लोक प्रेमाने व आदराने 'बादशाह खान' म्हणत असत. त्यांचे वडील बहराम खान एक प्रतिष्ठित, साहसी, उदार, इमानदार, खुदावर विश्वास ठेवणारे असे जमीनदार होते. निडर देशभक्त होते. आईही धार्मिक प्रवृत्तीची, सुंदर, सुशील, खानदानी, सुसंस्कृत, कुटुंबात रमणारी अशी गृहिणी होती. त्या काळात सीमान्त प्रांतात शाळाच नव्हती. मुल्ला-मौलवी कुराण शरीफ शिकवत असत. त्यानंतरचे शिक्षण पेशावरच्या म्युनिसिपल बोर्ड हायस्कूलमध्ये झाले.

 

           मग एडवर्ड मेमोरियल मिशन स्कूलमध्ये मॅट्रिकचे अर्धे शिक्षण झाले. तेव्हाच फौजेत भरती होण्यासाठी ते गेले. त्यांच्या सहा फूट तीन इंचाच्या कणखर शरीरयष्टीने सहजच त्यांना सेनेत भरती करून घेतले. पण इंग्रज अधिकाऱ्यांकडून हिंदुस्थानी सैनिकांना मिळणारी अपमानकारक वागणूक, अनादर बघून त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी लगेचच सेनेतील नोकरी सोडून दिली. मग लंडनमध्ये असलेल्या त्यांच्या भावाने त्यांना लंडनला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी बोलावले. तेव्हा जायचे नक्कीही झाले. पण आईचे दु:ख व रडणे सहन न होऊन लंडनच्या शिक्षणाचा विचार त्यांनी सोडून दिला.

 

           त्या काळात सीमान्त प्रांतात अज्ञान, अशिक्षितपणा, अंधविश्वास, परस्परांतील फूट, गरिबी व आदींमुळे जनता खूप त्रासात होती. मुल्ला-मौलवी इंग्रजी शिक्षणाच्या विरुद्ध होते. तेव्हा अब्दुल गफार खान यांनी त्यांच्या विचाराच्या तरुणांचा एक गट बनवून शिक्षण प्रसाराच्या कार्याला सुरुवात केली. जागोजागी शाळा काढल्या. मौलवी अब्दुल अजीजच्या मदतीने उतमानजईमध्ये शार स्थापना केली. हळूहळू संपूर्ण प्रांतात शाळा सुरू झाल्या. साहजिकच जनतेज या शैक्षणिक जागृतीचा त्रास इंग्रजांना व्हायला लागला. म्हणून मुख्य कमिशन गफार खानच्या वडिलांना बोलावून मुलाच्या या कृत्यासाठी धमकावले त्यांनी तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

 

          इ. स. १९१२ मध्ये वडिलांनी त्यांचे लग्न करून दिले. त्यांना दोन मला गनी खान व बली खान. तेव्हाही त्यांचे समाजसेवेचे व शिक्षणप्रसाराचे होते. अचानक १९१५ मध्ये त्यांची पत्नी निर्वतली, तेव्हा मुलांना आईकडे सोपवून ते तन, मन, धनाने देशसेवेत मग्न झाले. काही वर्षांनंतर आई वडिलांनी पुन्हा त्यांचा दुसरा विवाह करून दिला. इ. स. १९१८ च्या पहिल्या विश्वयुद्धानंतर इंग्रजांनी भारतावर ‘सैले अॅक्ट'सारखा दडपशाहीचा काळा कायदा लागू केला. संपूर्ण भारतातून याला | विरोध झाला. तेव्हा इंग्रज सरकारने मार्शल लॉ लागू केला. गफ्फार खाँना पकड़न मरदान तुरुंगात टाकले. तिथे बेड्या तोकड्या पडल्यामुळे हाता-पायाची त्वचा सोलवटली; पण त्यांनी तोंडातून चकार शब्दही काढला नाही.

 

        इ. स. १९२१ मध्ये 'अंजुमन-इसलाह-अल-अफगान' नावाची स्वतंत्र शाळा स्थापन केली. तिथे ते स्वतः शिकवत असत. त्यानंतर पेशावरच्या 'खिलाफत कमिटी'त अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दि. १७ डिसेंबर १९२१ ला अब्दुलजींना पुन्हा अटक करून ३ वर्षांच्या कडक कैदेची शिक्षा दिली. १९२४ मध्ये घरी येऊन बघतात तर घर मुलगा व आईच्या मृत्यूमुळे वैराण झाले होते. इ. स. १९२६ मध्ये वडील बहराम खान यांच्या मृत्यूनंतर रिवाजानुसार मुल्लांना धार्मिक विधींसाठी मोबदला द्यायचा होता. तसा तो न देता दोन हजारांची देणगी शाळेला दिली. त्यामुळे सगळे मल्ला त्यांच्यावर नाराज झाले. शिक्षणाबरोबर सामाजिक, राजकीय जागतीची आवश्यकता जाणून मे १९२८ मध्ये 'पख्तून' नावाचे वृत्तपत्र काढले. 

 

           इ. स. १९२९ मध्ये 'खुदाइ खिदमतगार' नावाची एक गैर राजनैतिक, स्वयंसेवी संस्था स्थापन केला. या संस्थेच्या सभासदांना नि:स्वार्थपणे लोकांची सेवा करणे. हिंसा न करणे, काणावर सूड न उगवणे किंवा जाई. या संस्थेच्या सभा होता. म्हणून काही दिवसांनी किंवा कोणाचा बदला न घेणे व क्षमाशील होणे अशी शपथ दिली संस्थेच्या सभासदांची वेशभूषा लाल होती व त्यांचा झेंडाही लाल दणन काही दिवसांनी ही संस्था 'लाल कुर्ती सेना' या नावाने प्रसिद्ध अब्दलजी त्याचे सेनापती झाले. त्यांनी 'सविनय अवज्ञा सत्याग्रह- भियान' चालवले. त्यात त्यांना अनेक वेळा अटक झाली. प्रथम मुंबई साखान्यात ठेवले. मग २९ डिसेंबर १९३४ ला साबरमती सेंट्रल जेलमध्ये पाठवले. १३ फेब्रुवारी १९३५ ला त्यांचे वजन १७० पौंडांवरून १४९ पौंडावर झाले होते. त्यांना खूप त्रास दिला गेला. तुरुंगातून सुटल्यावर अब्दुल गफार खान खदाई खिदमतगारसह काँग्रेसमध्ये सामील झाले.

 

         दि. २७ ऑक्टोबर १९४२ ला गफार खान आपल्या ५० साथीदारांसह चारसहाहन मरदान जिल्हा न्यायालयावर धरणे धरायला रवाना झाले. पण वाटेतच पोलिसांनी त्यांना पकडून इतके मारले की त्यांच्या दोन फासळ्या तुटल्या. कपडे रक्ताने माखले. मग त्यांना मरदान तुरुंगात टाकले. पण तिथेही त्यांच्यावर कोणतेच उपचार केले नाहीत. अब्दुलजी फाळणीच्या पूर्ण विरोधात होते. जेव्हा काँग्रेस कार्यकारिणीने फाळणीचा स्वीकार केला, तेव्हा ते म्हणाले की, “महात्माजींनी आम्हाला लांडग्यांच्या हवाली केले आहे." इंग्रज पहिल्यापासूनच मुस्लीम लीगच्या बाजूने होते आणि बादशाह खान मुस्लीम लीगचे शत्रू. त्यांना मुस्लीम लीगला तोडायचे होते.

 

         म्हणून मार्च १९४८ मध्ये सिंधच्या सईदबरोबर त्यांनी 'पीपल्स पार्टी'ची स्थापना केली. ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. साहजिकच पाकिस्तान सरकारने चिडून त्यांना १५ जून १९४८ रोजी अटक केली. नि:शस्त्र पठाण स्त्री-पुरुषांवर गोळ्या झाडून त्यांना मारले. १९५० मध्ये त्यांच्या अनुयायी गावांमध्ये बाँबहल्ला केला. १५ वर्ष बादशाह खानना स्वतंत्र पाकिस्तानच्या तुरुंगात नरकयातना भोगाव्या लागल्या. त्यांना मूत्रपिंडाचा आजार झाला. शेवटी त्यांची मरणासन्न अवस्था पाहून ३० जानेवारी १९६४ ला तुरुंगातून सोडले. तेव्हा ते उपचारासाठी इंग्लंडला गेले. तिथे त्यांची इंदिरा गांधींशी भेट झाली.

 

        गांधी शताब्दी समारंभात भाग घेण्यासाठी अब्दुलजींना भारतात बोलावले होते. १५ नोव्हेंबर १९६९ ला तीन मूर्ती मार्गावर एका विशेष समारंभात त्या वेळचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींनी त्यांना विश्व शांती व सद्भावनेचे प्रतीक असलेला 'नेहरू पुरस्कार' व पदक देऊन गौरविले. सद्भावनेचे प्रतीक असलेल्या त्यांच्या स्वप्नातील पाकिस्तानच्या नवनिर्मितीसाठी अब्दल गफार खाननी श्री. जी. एम. सैयद यांच्या मदतीने 'सिंधबलुची आणि पख्तून फ्रंट'ची स्थापना केली. तेव्हा पाकिस्तान सरकारने त्यांच्या सिंध प्रांतात प्रवेशावर बंदी घातली. इतक्या म्हातारपणात सतत संघर्ष करत झुंजत राहिल्यामुळे त्यांचे शरीर निर्बल झाले. भारत सरकारच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान.. दिल्ली इथे अब्दुलजी इलाज करण्यासाठी भारतात आले; पण त्यांची प्रकती  ढासळतच गेली.

 

      दि. १४ ऑगस्ट १९८७ रोजी, सत्य व अहिंसेच्या मार्गावर आमरण चालणाऱ्या, जीवनाच्या अंतापर्यंत त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, एका सच्च्या सुसंस्कृत खानदानी मुस्लीम धर्मीयाला, खान अब्दुल गफ्फार खाँ यांना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन भारताचे निधर्मी धोरण जगाला दाखवून दिले. त्यांच्यासारख्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला मानवंदना दिली. त्यानंतर १६ ऑगस्ट १९८७ रोजी आजारी अवस्थेतच अब्दुलजींना पेशावरला नेले. तिथल्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. शेवटी सुमारे सहा महिन्यांच्या आजारी व बेशुद्धावस्थेत राहन हा मानवतेचा व अहिंसेचा पुजारी, संघर्षशील अजेय सेनानी, परतंत्र व पीडित मानवतेचा उद्धारक शरीरत्याग करून दि. २० जानेवारी १९८८ रोजी ९८ वर्षांच्या दीर्घायुष्यानंतर अनंतात विलीन झाला.

 

           महात्मा गांधींच्या एका सच्च्या अनुयायाप्रमाणे त्यांनी आपले सारे आयुष्य सीमान्त प्रांताच्या जनतेच्या सेवेमध्ये घालविले ते 'सीमान्त गांधी' या नावानहा लोकप्रिय झाले. शिवाय प्रेमाने लोक त्यांना 'बेताज बादशाह-गांधी' असही म्हणत असत.