ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

महाराष्ट्राच्या 'त्या' १०६ हुतात्म्यांची नावं...

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 05:42 PM



आज मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा महाराष्ट्र राज्यात समावेश करण्यासाठी मोठा संघर्ष करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची गाथाही अशीच अंगावर शहारा आणणारी आहे. हा संघर्ष तितका सोपा नव्हता. किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये कित्येकांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली होती. ज्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र एकसंध ठेवला गेला... या सर्व हुतात्म्यांना आणि महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या प्रत्येकाला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात येत आहे. इतिहासाच्या पुस्तकांपासून ते अगदी अनेक ठिकाणी उल्लेख केला जात असल्याप्रमाणे या हुतात्म्यांची गाथा अनेकदा आपल्या कानांवर येते. चला तर मग, याच १०६ हुतात्म्यांच्या नावांवर एकदा नजर टाकत पुन्हा एकदा त्यांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता व्य़क्त करुया.

 

ही आहेत महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या  १०६ हुतात्म्यांची नावं...

२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे....

सिताराम बनाजी पवार

जोसेफ डेव्हिड पेजारकर

चिमणलाल डी. शेठ

भास्कर नारायण कामतेकर

रामचंद्र सेवाराम

शंकर खोटे

धर्माजी गंगाराम नागवेकर

रामचंद्र लक्ष्मण जाधव

के. जे. झेवियर

पी. एस. जॉन

शरद जी. वाणी

वेदीसिंग

रामचंद्र भाटीया

गंगाराम गुणाजी

गजानन ऊर्फ बंडू गोखले

निवृत्ती विठोबा मोरे

आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

बालप्पा मुतण्णा कामाठी

धोंडू लक्ष्मण पारडूले

भाऊ सखाराम कदम

यशवंत बाबाजी भगत

गोविंद बाबूराव जोगल

पांडूरंग धोंडू धाडवे

गोपाळ चिमाजी कोरडे

पांडूरंग बाबाजी जाधव

बाबू हरी दाते

अनुप माहावीर

विनायक पांचाळ

सिताराम गणपत म्हादे

सुभाष भिवा बोरकर

गणपत रामा तानकर

सिताराम गयादीन

गोरखनाथ रावजी जगताप

महमद अली

तुळशीराम पुंजाजी बेलसरे

देवाजी सखाराम पाटील

शामलाल जेठानंद

सदाशिव महादेव भोसले

भिकाजी पांडूरंग रंगाटे

वासुदेव सुर्याजी मांजरेकर

भिकाजी बाबू बांबरकर

सखाराम श्रीपत ढमाले

नरेंद्र नारायण प्रधान

शंकर गोपाल कुष्टे

दत्ताराम कृष्णा सावंत

बबन बापू भरगुडे

विष्णू सखाराम बने

सिताराम धोंडू राडये

तुकाराम धोंडू शिंदे

विठ्ठल गंगाराम मोरे

रामा लखन विंदा

एडवीन आमब्रोझ साळवी

बाबा महादू सावंत

वसंत द्वारकानाथ कन्याळकर

विठ्ठल दौलत साळुंखे

रामनाथ पांडूरंग अमृते

परशुराम अंबाजी देसाई

घनश्याम बाबू कोलार

धोंडू रामकृष्ण सुतार

मुनीमजी बलदेव पांडे

मारुती विठोबा म्हस्के

भाऊ कोंडीबा भास्कर

धोंडो राघो पुजारी

ह्रुदयसिंग दारजेसिंग

पांडू माहादू अवरीरकर

शंकर विठोबा राणे

विजयकुमार सदाशिव भडेकर

कृष्णाजी गणू शिंदे

रामचंद्र विठ्ठल चौगुले

धोंडू भागू जाधव

रघुनाथ सखाराम बीनगुडे

काशीनाथ गोविंद चिंदरकर

करपैया किरमल देवेंद्र

चुलाराम मुंबराज

बालमोहन

अनंता

गंगाराम विष्णू गुरव

रत्नु गोंदिवरे

सय्यद कासम

भिकाजी दाजी

अनंत गोलतकर

किसन वीरकर

सुखलाल रामलाल बंसकर

पांडूरंग विष्णू वाळके

फुलवरी मगरु

गुलाब कृष्णा खवळे

बाबूराव देवदास पाटील

लक्ष्मण नरहरी थोरात

ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

गणपत रामा भुते

मुनशी वझीऱअली

दौलतराम मथुरादास

विठ्ठल नारायण चव्हाण

देवजी शिवन राठोड

रावजीभाई डोसाभाई पटेल

होरमसजी करसेटजी

गिरधर हेमचंद लोहार

सत्तू खंडू वाईकर

गणपत श्रीधर जोशी

माधव राजाराम तुरे(बेलदार)

मारुती बेन्नाळकर

मधूकर बापू बांदेकर

लक्ष्मण गोविंद गावडे

महादेव बारीगडी

कमलाबाई मोहित

सीताराम दुलाजी घाडीगावकर