ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - प्रियदर्शिनी इंदिरा गांधी

पोस्ट :  जानेवारी 08, 2020 07:56 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९७१ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर महिला नेत्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांची थोडक्यात माहिती. 

 

        इंदिरा गांधींचा जन्म दि. १९ नोव्हेंबर १९१७ ला अलाहाबाद येथे झाला. इंदिरा गांधी या पंडित जवाहरलाल नेहरू व कमलादेवी याची एकुलती एक मुलगी इंदिराजींचे बालपण अलाहाबादच्या आनंदभवनमध्ये राजेशाही थाटात गेले.    

      
        वयाच्या ४-५ व्या वर्षी इंदिरा गांधीजींचे वडील व आजोबांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. वयाच्या १० व्या वर्षी समाजसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन इंदिरा गांधी प्रत्येक रविवारी सायकलवरून 'कुष्ठगृहात' रुग्णाची सेवा करायला जात असत. इंदिरा गांधींना १२ व्या वर्षी काँग्रेस पार्टीची सदस्य व्हायचे होते. पण लहान वयामुळे ते शक्य झाले नाही. तेव्हा स्वत:ची 'वानर सेना' काढून त्यांनी ही इच्छा पूर्ण केली. त्या काळात ही सेना लोकप्रिय झाली होती. तिची स्वातंत्र्य चळवळीला मदतही झाली होती. वडिलांचा तुरुंगवास व आईच्या आजारपणामुळे त्यांच्या शिक्षणात सतत व्यत्यय येत असे.

 

        त्यांनी इ. स. १९२३ मध्ये अलाहाबादच्या सेंट सेसिला स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इ. स. १९२६ मध्ये स्वित्झर्लंडला जाऊन तिथे अभ्यास केला. भारतात परतल्यावर गांधीजींच्या सांगण्यावरून पुण्याच्या ‘प्यूपिल्स ऑन स्कूल'मध्ये शिक्षण सुरू झाले. दि. ४ जुलै १९३४ मध्ये मुंबईला मॅट्रिक परीक्षा पास केली. मग गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये त्यांना पुढच्या शिक्षणासाठी पाठविले. तिथे स्वत:चा कामे स्वत; करणे, खादीच्या कपड्यात राहणे हे त्या शिकल्या. 


        इंदिरा १३ वर्षांच्या असताना जवाहरलालना त्यांच्या शिक्षणाची नेहमीच काळजी वाटे. कारण ते बऱ्याचदा तुरुंगात व आई आजारी. मग यावर एक अनोखा उपाय त्यांनी शोधला. 'पित्याची पत्रे, लेकीच्या नावे' या शीर्षकाने  त्यांचा पत्रसंग्रह पुढे प्रकाशित झाला. या पत्राद्वारे त्यांनी आपल्या मुलीवरची माया, तिचा अभ्यास व नवीन विचारधारा असा व्यापक दृष्टिकोन साधला. सगळ्या जगाला भारून टाकणाऱ्या, नवी दिशा देणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या बहादूरांना आपल्या इंदिरांसमोर उभे केले होते. यातून इंदिराजींच्या व्यक्तित्वाला एक नवे वळण मिळाले.


      तसेच त्यांनी इंदिरांना पुण्याच्या एका पारशी कुटुंबातील कुंवर बाई जहाँगीर या वृद्ध महिलेकडे शिक्षणासाठी ठेवले. तिथे राहूनच त्या मॅट्रिक झाल्या. आजोबा मोतीलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर, दि. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी इंदिराजींची आई कमला नेहरू यांचा मृत्यू, हा तिला दुसरा धक्का होता. आता त्यांना केवळ आपल्या वडिलांचाच एकमात्र आधार होता. आपल्या आईच्या मृत्यूनंतर इंदिरा ऑक्सफर्डला इतिहास शिकायला गेल्या. भारतामधल्या परिस्थितीमुळे त्यांचे लक्ष तिथे लागले नाही व त्या परत आल्या. मग इ. स. १९३८ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्या सामील झाल्या.


     दि. २६ मार्च १९४२ रोजी इंदिराजींचा विवाह फिरोज गांधींशी वैदिक पद्धतीने झाला. त्यानंतर फिरोज यांच्याबरोबर त्या लखनौला गेल्या. कारण तिथे ते नॅशनल हॅरॉल्डचे प्रबंधक होते. लगेचच हे नवदाम्पत्य जोडपे 'भारत छोडो' आंदोलनात उतरले. त्यात दोघांनाही तेरा महिन्यांची कैद झाली. वडील पं. जवाहरलाल पंतप्रधान झाल्यावर इंदिरा त्यांच्या स्वीय सचिव, साहाय्यक, नर्स, हाऊसकीपर आदी जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या. त्यांच्याबरोबर देश-विदेशांत फिरतही होत्या. याच दरम्यान १९६० मध्ये इंदिराजींचे पती फिरोज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर इंदिराजींनी स्वत:ला वडिलांच्या सेवेत सामावून घेतले. इ. स. १९५९ मध्ये त्या पार्टीची अध्यक्ष झाल्या.

 

      इ. स. १९६४ मधे नेहरूंच्या निधनानंतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी इंदिराजींना सूचना एवं प्रसारण मंत्रालय दिले. ११ जानेवारी १९६६ मधल्या ताश्कंद येथील शास्त्रींच्या मृत्यूनंतर दि. १९ जानेवारी १९६६ ला झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाई यांना १६६ मतांनी हरवून इंदिराजी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष झाल्या. 


       दि. २४ जानेवारी १९६६ ला भारताच्या पहिल्या महिला विशेष पद्धत होती. पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. पंतप्रधान इंदिराजींची कामाची एक स्वत:ची अशी विशेष पद्धत गरिबी हटवून आर्थिक समानता आणण्यासाठी त्यानी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले. इ. स. १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धाच्या वेळी इंदिरा आपल्या खंबीर विचारांचे दर्शन त्यांच्या निर्णयामधून दाखविले. जग इतिहासामध्ये एका नवीन देशाची 'बांगला देशाची' निर्मिती केली. या त्यांची दूरदृष्टी व धैर्याने निर्णय घेण्याची क्षमता साऱ्या जगाला दिसून आली. देशाला स्वतंत्र करून तेथील सत्ता त्यांनी त्या देशातील लोकाप्रय नेता मुजिबुर्रहमान याच्याकडे सोपवली. या कार्यासाठी देशाच्या संसदेतील त्याच्या विरोधकांनीही त्यांना दुर्गेची उपमा दिली. 

 

        तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींनी पंतप्रधान श्रीमती इंदिराजींना इ. स. १९७१ मध्ये 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरविले. इ. स. १९८० मध्ये मध्यावधी निवडणूक होऊन त्यात इदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या. यावरून त्यांचा दृढनिश्चय, आत्मविश्वास, लक्ष्य गाठण्याची तळमळ, पराजयाला विजयात बदलण्याचे सामर्थ्य हे सर्व दिसून येते. इ. स. १९८४ ला पंजाबमध्ये हिंसा आणि पृथकतावादाचा प्रचार करणाऱ्या आतंकवाद्यांविरुद्ध त्यांनी भारतीय सेनादलाचा उपयोग केला. धीटपणे घेतलेला हा निर्णय होता. 


        त्या आदेशावरून भारतीय सेनेने 'ऑपरेशन ब्लू स्टार'नुसार अमृतसरच्या सुवर्ण मंदिर व इतर धार्मिक स्थानात दडून राहिलेल्या आतंकवाद्यांना जबरदस्तीने बाहेर काढले. पंजाबमधला आतंकवाद्यांचा हा उद्रेक मोडून काढला. यामुळे भडकून उठून या आतंकवाद्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार इंदिराजींच्याच सुरक्षा रक्षकानी दि. ३१ ऑक्टोबर १९८४ ला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची हत्या केली. अशा प्रकारे जगाच्या इतिहासातील ही एक पोलादी स्त्री, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाची पहिली महिला पंतप्रधान अनंतात विलीन झाली.