ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी -  पंडित गोविंद वल्लभ पंत   

पोस्ट :  डिसेंबर 30, 2019 03:49 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९५७ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते पंडित गोविंद वल्लभ पंत यांची थोडक्यात माहिती. 


          पंडित गोविंद वल्लभ पंतांचा जन्म उत्तर प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्यामध्ये चट खेड्यात दि. १० सप्टेंबर १८८७ रोजी झाला. आज हे ठिकाण उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत येते. ते भारतीय राजनीतीचे दूरदर्शी नेता होते.


          पंतजींचे पूर्वज मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी होते. ते जेव्हा बद्रिनाथच्या यात्रेला गेले होते तेव्हा अल्मोड्याच्या राजेसाहेबांवर त्यांची विद्वत्ता व एकूणच व्यक्तिमत्त्वाची जबरदस्त छाप पडली होती. म्हणून त्यांनी आपल्याजवळ राहायला बोलाविले. सुरुवातीला ते अल्मोड्याच्या छूट गावी राहिले; पण नंतर मात्र त्यांची नैतिकता व पवित्र आचरणाने सारे कुमाऊँ क्षेत्रच त्यांचे झाले. 


         पंतजींचे वडील श्री. मनोरथ पंत राजस्व विभागात कामाला असल्यामुळे सतत फिरतीवर असत. नानांना रायबहादूरचा किताब मिळाला होता. ते समाजातील एक मान्यवर होते. मोठे अधिकारी असल्यामुळे त्या प्रदेशातील राजनीतीही त्यांना व्यवस्थित समजत होती. त्यांचे आजोळ भीमतालजवळील चकाता गावात होते. नाना रायबहादर बद्रीप्रसाद जोशी अल्मोडामध्ये ज्यूडीशियल अधिकारी होते, म्हणूनच त्यांची आई त्यांना आपल्या वडिलांकडे शिक्षणासाठी घेऊन गेली. घरात कूर्मांचलला इंग्रज सरकारद्वारा हडपण्याच्या गोष्टी चालू होत्या. बालक पंत लक्षपूर्वक ऐकत असे. म्हणूनच लहानपणापासून त्यांना राजकारणात रस निर्माण झाला.


        पंतजी लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. म्हणूनच रायबहादूर बद्रीप्रसाद या आपल्या नातवाची विशेष काळजी घेत असत. अल्मोडा जिल्ह्याच्या कॉलेजमधून इंटरमिजिएट पास करून अलाहाबादला सेंट्रल म्योर कॉलेजमध्ये बी. एक एस. सी. ही केले. उत्तर प्रदेशातील डॉ. काटजू, राजर्षी पुरुषोत्तमदास-समाजवादी महान विचारक आचार्य नरेंद्र देव, पं. हृदयनाथ कुजस वगैरे प्रति नेता याच कॉलेजचे विद्यार्थी होते.


         पंतजींच्या अलाहाबादच्या विद्यार्थी काळात स्वदेशी आंदोलन सस झाले होते. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात होता. पंजाबमधील लाला लजपतराय, महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक असे प्रमुख नेता आपल्या ओजस्वी, धारदार भाषणांनी देशप्रेमाचे स्फुल्लिंग साऱ्या जनतेमध्ये चेतवत। होते. साहजिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त जोश संचारला. पंतजी विद्यार्थीदशेपासूनच विद्रोही स्वभावाचे होते. इंग्रजांविषयी आधीपासूनच त्यांच्या मनात तिरस्कार, चीड भरून राहिली होती. आपले हेच विचार त्यांनी इ. स.१९०६ मध्ये माघ मेळ्यात त्रिवेणीवर अलाहाबादच्या सर्व जनतेसमोर भाषणाच्या रूपाने मांडले. हे भाषण खूपच जहाल होते. राजकारणातला त्यांचा प्रवेश यातूनच सूचित झाला. साहजिकच हे अधिकाऱ्यांना भावले नाही. म्हणून त्यांनी पंतजींना कॉलेजमधून काढून टाकले; पण मालवीयजींच्या मध्यस्थीमुळे पुन्हा त्यांना प्रवेश मिळाला.


         इ. स. १९०९ मध्ये एल.एल.बी. पास करून पंतजींनी काशीपूरमध्ये वकिली सुरू केली. प्रामाणिक प्रयत्न व खूप मेहनत केल्यामुळे त्यांची वकिली खूपच यशस्वी झाली. इ. स. १९१६ मध्ये स्थानिक जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी 'कुमाऊँ परिषद' नामक एक संघटन स्थापन केले आणि सतत त्याद्वारे मागासलेल्या लोकांसाठी, त्यांच्या विकासासाठी झगडत राहिले. भारतात व विशेषतः पहाडी प्रदेशात गरिबांकडून वेठबिगार करवून घेतला जात असे. पंतजी या वेठबिगारीच्या विरुद्ध होते. या प्रथेविरुद्ध त्यांनी जनआंदोलन छेडले आणि ही प्रथा बंद करूनच थांबले.


        १९२०-२१ च्या असहयोग आंदोलनामुळे सगळा देश ढवळून निघाला होता. विद्यार्थ्यांनी शाळा-कॉलेजवर बहिष्कार घातला होता. वकिलांनी कोर्टात जाणे बंद केले होते. पंतींनीही वकिली सोडून पूर्णपणे राजकारणात भाग घेतला होता. सर्वप्रथम मोतीलाल नेहरूंनी इ. स. १९२३ मध्ये पंतजींना 'स्वराज्य दलाचा' नेता म्हणून निवडले. त्याच वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणूनही ते निवडून आले. या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडल्या.


          दि. ३० नोव्हेंबर १९२८ रोजी भारतात आलेल्या 'सायमन कमिशनला' जनतेने कडाडून विरोध केला. देशातील तरुण लखनौच्या रस्त्यांवर काळे होंडे घेऊन बुलंद घोषणा देत होते. या काळात देशात ठिकठिकाणी इंग्रज सरकारने दडपशाही, जुलूम, अत्याचार सुरू केले होते. लाहोरला एका मिरवणुकीत लाला लजपतराय घायाळ झाले. लखनौमध्येही एका जमावावर इंग्रज सरकारने अत्याचार केला. लाठीहल्ला केला. घोडेस्वारांनी सामान्य, शस्त्रहीन जनतेला तुडवले. एका दलाचे नेतृत्व पंतजींकडे होते. 'जयहिंद' व 'सायमन परत जा' च्या घोषणा देत पुढे पुढे जात राहिले. लखनौमध्ये पोलीस लाठीहल्ला करीत जवाहरलालजींपर्यंत पोहोचले. सशस्त्र पोलीस व घोडेस्वारांच्या तुकडीने त्यांच्या गटाला घेरले. अत्यंत क्रूरतेने लाठ्या व कोडे फटकारत राहिले. त्याच वेळेला सहा फुटाच्या उंचापुऱ्या, धट्ट्याकट्ट्या पंतजींनी नेहरूंना, त्यांच्यावर झोपून संरक्षण दिले. त्या भयंकर मारामधून नेहरूंना वाचविले. बेशुद्ध होईपर्यंत लाठीमार खात राहिले. तरीही त्यांचे ओठ हलतच राहिले - 'सायमन परत जा'. या मारामुळे त्यांचे शरीर पूर्ण दुर्बल झाले. अनेक रोगांचे शिकार झाले. या क्रूर यातनांनी त्यांची कंबर कायमची अडकली. नेहरूंद्वारा पंतजींचा सन्मान होण्याचे हे एक कारण सांगितले जाते. जर त्या वेळेला पंतजींनी नेहरूंचा लाठीमारापासून बचाव केला नसता तर कदाचित भारताचा इतिहास बदलला असता. या लाठीमारामुळे पंतजींची शारीरिक हानी झाली; पण बौद्धिक क्षमतेवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. नेहरूंनी याला पंतजींची मोठी कुर्बानी म्हटले. पंतजींनी 'मिठाचा कायदा' तोडल्यामुळे 'सत्याग्रह आंदोलनात' त्यांना कैदेत पाठविले.


          इ. स. १९३५ मध्ये जेव्हा प्रांतीय असेंब्लीच्या निवडणुका झाल्या, तेव्हा पंतजींना काँग्रेस दलाचे नेता निवडले गेले. जेव्हा उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. त्या काळात खरी सत्ता तर गोऱ्या अधिकाऱ्यांच्याच हातात होती; पण पंतजींनी आपल्या चाया स्थिती बदलली, ते गोऱ्या सरकारी अधिकाऱ्यांकडूनही त्याच प्रकारचे करून घेत व त्यांना तोच दर्जा देत, जो भारतीय सरकारी अधिकाशा दिला जाई. एकदा पंतजींचे एक सहकारी मंत्री अजित प्रसाद जैन यांचा दौऱ्याच्या वेळी एका गोऱ्या सरकारी अधिकाऱ्याने अनुपस्थित राहून त्यांचा अपमान केला. जेव्हा ही घटना पंतजींना समजली, तेव्हा त्यांनी त्या इंग्रज सरकारी अधिकाऱ्याची पदावनती करून त्याला खालच्या पदावर देवरिया तहसीलमध्ये पाठविण्याचा आदेश दिला. या बाबतीत त्या प्रदेशाच्या गव्हर्नरने स्वतः मध्यस्थी केल्यावर, त्या अधिकाऱ्याला अजित प्रसाद जैन यांची माफी मागावी लागली आणि मग कुठे हा प्रसंग निभावला.


         इ. स. १९४२ च्या 'चलेजाव' चळवळीच्या वेळी जेव्हा इंग्रजांनी सर्वच भारतातील नेत्यांना अटक केले होते, त्यात पंतजीही होतेच. या प्रकारे त्यांना अनेक वेळा तुरुंगवाऱ्या कराव्या लागल्या. कष्ट, यातना सहन कराव्या लागल्या. मात्र ते आपल्या तत्त्वांपासून ढळले नाहीत. आदर्शावर ठाम राहिले. 


        पंतजींना 'टायगर ऑफ कुमाऊँ' म्हटले जाते. स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा विभिन्न प्रांतांत काँग्रेसची मंत्रिमंडळे बनविली गेली, तेव्हा पंतजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हाही आणि त्याआधी वकिली करतानाही इंग्रज अधिकाऱ्यांचे ते काही चालू देत नसत. ते त्यांचे कट्टर विरोधी होते. अत्यंत कुशाग्र बुद्धी व चित्त्याप्रमाणे चपळ साहसी होते. त्यांची प्रसन्न मुद्रा व भव्य शरीरयष्टी कोणालाही पटकन आकर्षित करीत असे. 


           १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर पंतजी पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी विकासाची खूप महत्त्वाची कामे केली. उत्तर प्रदेशातील १६५०० एकर जमीन कृषियोग्य बनविली. तिथे एक कृषी विद्यापीठ स्थापन केले. तेथील फुलबागा, उद्याने, सुंदर इमारती, ध केंद्रे, झरे, विमानतळ इ. आजही पंतजींची आठवण करून देतात. सर्वांत प्रथम जमीनदारी प्रथा उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी संपवली. मालगुजारी बंद झाली. हिंदीला सर्वप्रथम कामकाजाची भाषा बनविण्याचे श्रेय उत्तर प्रदेशलाच प्राप्त झाले. 


          सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर नेहरूंनी त्यांना केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री बनविले. सुरुवातीपासूनच त्यांना १२-१४ तास काम करण्याची सवय होती. प्रत्येक वेळी ते कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असत. कधी कधी तर ते १८-२० तासही काम करीत. यातूनच इतरांना कामाची प्रेरणा मिळत होती.


        पंतजी सहिष्णू वृत्तीचे होते. साधी राहणी उच्च विचारसरणीचे होते. धैर्यवान होते. सहसा कधी रागावत नसत; पण जर रागावलेच तर समोरच्याला समजत नसे त्यांना राग आलेला. खरेखुरे सुसंस्कृत होते.


        इ. स. १९५९ मध्ये त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करायला सांगितलं. पण त्यांच्या मते, 'काम म्हणजेच खरा आराम होता. माणूस जर काम करू शकत नसेल तर निरर्थक जगण्याचा काय उपयोग!' ही त्यांची विचारसरणी होती. ते मिताहारी, तसेच मितभाषीही होते.


       पंतजी केवळ उत्तर प्रदेशासाठी नव्हे, तर पूर्ण भारतासाठी महान व्यक्ती होते. म्हणून भारत सरकारने आपले कर्तव्य समजून या दूरदर्शी राजकारणी व्यक्तीला इ. स. १९५७ मध्ये 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. 


         फेब्रुवारी १९६१ मध्ये पं. गोविंद वल्लभ पंत आजारी घडले. जवळजवळ १५ दिवस बेशुद्धावस्थेत होते. दि. ७ मार्च १९६१ रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.