ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. भीमराव आंबेडकर

पोस्ट :  जानेवारी 16, 2020 07:42 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९९० मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते डॉ. भीमराव आंबेडकर यांची थोडक्यात माहिती. 


         डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे दि. १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई. आंबेडकरांचे वडील तिथल्याच सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते. १८९३ मध्ये वडील रामजी नोकरीमधून निवृत्त झाले. 


        तेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्रातील सातारा येथे कुटुंबासह राहण्यास आले. वयाच्या ५ व्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले. आईचा मृत्यू त्यांच्या वयाच्या ६ व्या वर्षी झाला. त्या काळात समाजात असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेचे चटके लहान भीमरावांना नेहमीच सहन करावे लागले. पण त्यातूनही प्रेरणा घेऊन ते आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहिले. भीम खूप हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे ते आवडते होते. त्यांनीच 'आंबवडेकर' हे त्यांचे आडनाव बदलून 'आंबेडकर' लिहिले. प्राथमिक शाळेनंतर वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये घातले आणि सगळे कुटुंब पटेल मजूर कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले. चाळीच्या गजबजाटामुळे भीमरावाचा अभ्यास नीट होत नव्हता. म्हणून मध्यरात्री दोन वाजताच उठून ते अभ्यासाला बसत असत. दिवसा चर्नी रोड जवळील उद्यानात अभ्यासाला जात असत. तिथे केळुसकर नावाच्या एका विद्वान गृहस्थांशी भीमरावांची ओळख झाली. त्यांच्याकडून ते खूप काही चांगले शिकत गेले. इ. स. १९०७ साली भीमराव मॅट्रिक झाले. त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न दापोलीच्या रमा यांच्याशी झाले. त्या वेळी रमा ९ वर्षांच्या होत्या. त्यानंतरही त्यांचा अभ्यास सुरूच होता. घरची आर्थिक स्थिती तंगीची असल्यामुळे श्री. कुळुसकरांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांकडून त्यांना महिना  वीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली.


        इ.स. १९१२ मध्ये ते बी. ए. झाले. मग बडोदा रियासतीतच त्यांना रच्या पदावर नोकरी मिळाली. नोकरीवर रुजू पंधरा दिवस झाले नाही तोच, मुंबईला वडिलाच्या आजारपणाची तार मिळाली व त्यातच इ. स. १९१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली.  त्यांना समजले की बडोद्याचे महाराज परदेशात शिशुवृत्ती देतता . त्याच्या बदल्यात बडोदा संस्थानात १० वर्षे नोकरी करावी त्यांनी मान्य केली आणि १२ जुलै १९१३ रोजी ते न्यूयॉर्कलाने इ. स. १९१५ मध्ये ते एम. ए. झाले व इ. स. १९१६ मध्ये कोलंबियाना त्यांनी पी. एच. डी.चा प्रबंध प्रस्तुत केला. नंतर लंडनला जाऊन ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स' विद्यापीठात अर्थशास्त्र व  राजनीतिशास्त्राचा अभ्यास केला. त्याच वेळी त्यांच्या शिष्यवृत्तीचा कालावधी संपून बडोदा संस्थानात फौजी सचिवाच्या पदावर नोकरीला लागले. इथे त्यांच्यापेक्षा खालचे अधिकारी व कामगारांनी त्यांचा अधिकार मानला नाही. म्हणून अपमानित दोऊन इ. स. १९१७ मध्ये नोकरी सोडून ते मुंबईला निघून आले.


          नोव्हेंबर १९१८ मध्ये ४५० रु. पगारावर, सिडन्हॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तरीही उच्च शिक्षण घेण्यासाठी भीमराव अस्वस्थ पाहाचलं होते. म्हणून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व मित्रांच्या मदतीने इ. स. १९२० मध्ये इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरीचे शिक्षण घेऊ लागले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतताना ते ३ महिने जर्मनीमध्ये थांबले. तेथे त्यांनी बॉन विश्वविद्यालयमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. 


         नोकरी काय, वकिली काय. प्रत्येक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता आड येत होती. म्हणून त्यांनी मागासलेल्या व दलित जातींचे नेतृत्व करायला सुरुवात केली. शोषित-पीडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले. देशात जागोजागी संस्था सुरू केल्या. मुंबईत 'बहिष्कत हितकारिणी' सभा उघडली. या संस्थेमार्फत मागास, अस्पृश्य वर्गासाठी शाळा, विद्यार्थी वसतिगृह, ग्रंथालय सुरू केले. मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीची मागणी केली. सरकारला मान्य कर आदेश निघाला की, सरकारमान्य. सरकारी साहाय्यता मिळालेल्या लागले. सरकारी आदेश निघाला की, सरकारमान्य, सहकारी सहाय्यता मिळालेल्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना घ्यावेच लागेल. एका बाजूने डॉ. आंबेडकर सरका मागासवर्गियांना न्याय मिळवून देत होते तर दुसऱ्या बाजूने या जातींमध्ये पसा अंधविश्वास, वाईट चालीरीती मुळातून उखडून फेकण्याचा प्रयत्न करीत हो मंदिर प्रवेश, पाणीप्रश्न सोडविण्यात यशस्वी होत होते. 


       अमेरिका प्रवासात डॉ. आंबेडकरांना आजपर्यंत कधीही न मिळालेला समानतेचा व्यवहार अनुभवायला मिळाला. लिंकन व वॉशिंग्टन यांची जीवनचरित्र वाचून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या अनुभवाला नवीन रंग मिळाला. अस्पृश्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष करायला विवश केले. ते जेव्हा १९१३ मध्ये अमेरिकेत गेले होते; तेव्हा लाला लजपतराय यांनी आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा, यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण ते त्या वेळी सहमत नव्हते. आता त्यांचे भारताच्या राजकारणावरही नीट लक्ष होते. त्यांनी आपली पूर्ण ताकद भारतातील अस्पृश्योद्धारासाठी वापरली. ४ ऑक्टोबर १९३० व १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी मुंबईहून ते रवाना झाले होते. त्या परिषदेत भारतातील जातिव्यवस्थेसंबंधी जोरदार शब्दांत आपले विचार त्यांनी मांडले होते.


        लंडनहून परतल्यावरही भारतात जातिव्यवस्था समाप्त करण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला. २० ऑक्टोबर १९३२ ला इंग्रज प्रधानमंत्र्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली. पण या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण आरंभिले. शेवटी पुण्यात झालेल्या एका चर्चेत अस्पृश्यांना वेगळा मतदारसंघ न देता त्यांना वेगळे प्रतिनिधित्व देण्याचे निश्चित ठरले. काँग्रेसने अस्पृश्यांना काही विशेष सुविधा दिल्या. तेव्हापासून अस्पृश्यांबरोबर असलेल्या हिंदूंच्या दृष्टिकोनात बराचसा फरक झाला. पंडित मदनमोहन मालवीयजींनी मुंबईतील एका मोठ्या सभेत अस्पृश्यांना विहिरी, तळी व सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याचे अधिकार देण्याची घोषणा केली. यापुढे कोणाला अस्पृश्य म्हटले जाणार नाही असेही जाहीर केले. या सगळ्या धोरणांच्या कार्यवाहीसाठी अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना केली. हाच पुढे 'हरिजन सेवक संघ' झाला. गांधींनी 'हरिजन' नावाची पत्रिका सुरू केली.


           ऑगस्ट १९३६ मध्ये आंबेडकरांनी 'स्वतंत्र मजूर दल' स्थापन केले. त्याच ते अध्यक्ष निवडले गेले. दि. १७ फेब्रुवारी १९३७ रोजी झालेल्या निवडणुकात यांच्या दलाचे १७ पैकी १३ साथी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल.  डॉइसरॉयनी जुलै १९४२ मध्ये कार्यकारी परिषद तयार केली. त्यात डॉ. देडकरांना श्रममंत्री पद दिले. इ. स. १९४६ मध्ये भीमराव संविधान सभेचे साय निवडले गेले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. २९ ऑगस्टला भारताचे संविधान तयार करू लागले. फेब्रुवारी १९४८ मध्ये, केवळ ६ महिन्यांत संविधानाचा कच्चा मसुदा तयार करून, डॉ. आंबेडकरांनी तो डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे सोपविला. या सततच्या परिश्रमांमुळे ते आजारी पडले. तेव्हा डॉ. सविता कबीर यांनी त्यांची शुश्रूषा केली. 


     २९ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेने डॉ. आंबेडकरांनी सादर केलेले संविधान भारतासाठी स्वीकारले. पण नंतर काही वैचारिक विरोधामुळे २७ सप्टेंबर १९५१ रोजी डॉ. भीमरावांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते मुंबईला आले. त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. कारण त्यांच्या मते हिंदू समाजात स्वतंत्रता व समानतेचा अभाव होता. दि. १५ नोव्हेंबर १९५६ ला त्यांनी विश्व बौद्ध संमेलनात भाग घेतला. त्यांच्याबरोबर अनेकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.


         हिंदू समाजातील दडपशाही प्रवृत्तीविरुद्ध केलेल्या विद्रोहाचे प्रतीक म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर होते. एका दरिद्री, अस्पृश्य, दलित, उपेक्षित कुटुंबात जन्मलेले आपली कर्मठता, दृढ संकल्पशक्ती, अदम्य भावना आणि मुत्सद्देगिरीमुळे भारतातील वर्षानुवर्षे दलित, पिचलेल्या, पिडलेल्या समाजासाठी खरेखुरे देवदूत होऊन आले. स्वतंत्र भारताच्या संविधानाचे निर्माते झाले. अशा या महान नेत्याचे चरित्र खरोखरीचे प्रेरणास्पद आहे.


          दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी या भारतातील क्रांतिकारी महामानवाचा मृत्यू झाला. भारत सरकारने भारताच्या या सुपुत्राचा सन्मान इ. स. १९९० रोजी राष्ट्राचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार देऊन केला.