‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. विधानचंद्र राय
पोस्ट : जानेवारी 02, 2020 05:35 PM
‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९६१ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते डॉ. विधानचंद्र राय यांची थोडक्यात माहिती.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वकील, राजनीतिज्ञ, राजकारणी यांच्या बरोबरीने डॉक्टर वैद्य आदींचा सहभागही महत्त्वपूर्ण होता, त्यांच्यातील डॉ. विधानचंद्र राय हे प्रमुख होते.
मोगलांशी आयुष्यभर लढून शेवटी पकडल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या प्रतापादित्य राजाचे डॉक्टर विधानचंद्र राय हे वंशज होते. डॉ. विधानचंद्रांचे वडील प्रकाशचंद्र राय, त्यांचे वैभव गेलेले. अशा वेळी गरिबीमुळे कसेबसे शिक्षण झाले. सामान्य नोकरी. कामिनी देवीशी लग्न झाले. दोन मुली, तीन मुलगे. त्यातील सर्वांत लहान डॉ. विधानचंद्रांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी पाटण्यातील बाँकीपूर गावामध्ये झाला. आदर्श माता-पित्यांकडून त्यांना त्याग, परिश्रम व सेवेचे शिक्षण मिळाले होते.
लहानपणी इतर सामान्य मुलासारखे बालक विधानचंद्र शाळा चुकविण्यात आनंद मानत असत. बाँकीपूर कॉलेज, पाटणा येथे बी. ए. झाल्यावर इ. स. १९०१ मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये गेले. गरिबीमुळे शिष्यवृत्ती व हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचे काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मेडिकल कॉलेजचे व्हाइस प्रिंसिपल कर्नल ल्यूकिसनी स्वाभिमान, महत्त्वाकांक्षा, त्याग, परिश्रम हे त्यांना शिकविले.
इ. स. १९०६ मध्ये डॉक्टर झाल्यावर प्रांतीय चिकित्सा सेवेमध्ये कर्नल ल्यूकिसचे साहाय्यक म्हणून डॉ. विधानचंद्र राय यांची नेमणूक झाली. त्या नोकरीत अनेक इंग्रज अधिकाऱ्यांशी नियमाप्रमाणे कडक वागावे लागले, त्यांची स्वत:ची योग्यता, धैर्य व कर्नल ल्यूकिसचे सहकार्य यामुळे ते यशस्वी झाले. मेडिकल कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्याच कॉलेजमधले प्राध्यापक कर्नल पैक यांच्या विनंतीवरून एका अपघातप्रसंगी खोटी साक्ष द्यायला त्यांनी नकार दिला. कर्नल पेकनी त्याचा बदला परीक्षेत मार्क कमी देऊन घेतला. पण नंतर त्यांची योग्यता, प्रामाणिकपणा व खरेपणामुळे स्वत: कर्नल पेकनी त्यांची क्षमा मागितली.
१९०८ मध्ये डॉ. विधानचंद्र पुढील अभ्यासासाठी 'सेंट बर्थो लोम्यूज’ हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील डीनने यांना प्रवेश नाकारला. यांच्या अनेक चकरा झाल्यावर नाइलाजाने डीनने त्यांना प्रवेश दिला. तिथे संपूर्ण दिवसभर मृत शरीरांच्या शस्त्रक्रिया करण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे करून अतिशय मेहनतीने विशेष स्थान मिळविले आणि त्यांना प्रवेश नाकारलेल्या डीननेच त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारतात परत येऊन पुन्हा ते प्रांतीय सेवा चिकित्सेच्या नोकरीत लागले. एक चांगले चिकित्सक डॉक्टर म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. या कार्यात ते मनापासून मानवतेची सेवा करीत होते. अचानक एकदा त्यांना सांगितले की, कलकत्ता विद्यापीठाच्या कारमाइकेल मेडिकल कॉलेजला (के. आर. जी. मेडिकल कॉलेज) तेव्हाच मान्यता मिळेल, जेव्हा डॉ. विधानचंद्र तिथे प्राध्यापक पद स्वीकारतील. हे मेडिकल कॉलेज राष्ट्रीय विचारांच्या लोकांनी स्थापन केलेले होते. डॉक्टरांनी मागचा-पुढचा काहीएक विचार न करता ताबडतोब सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व इ. स. १९१९ मध्ये या नव्या कॉलेजात दाखल झाले. ते जीवनभर इथेच सेवेत राहिले.
त्या काळात स्वातंत्र्याच्या लढाईचा जोर वाढत होता. तेव्हा डॉ. विधानचंद्र इ. स. १९२३ मध्ये काँग्रेसतर्फे कलकत्ता नगर (उत्तर) भागातून सर सुरेंद्रनाथ बानर्जी यांच्याविरुद्ध निवडणुकीला उभे राहिले आणि ३५०० वाढीव मतांनी विजयी झाले. १९३१-३२ मध्ये ते कलकत्त्याचे मेयर झाले. ते नेहमीच इंग्रज सरकारला कलकत्ता कॉर्पोरेशनच्या कारभारापासून दूर ठेवत असत. नगर सुधारण्याचा त्यांनी जास्तीतजास्त प्रयत्न केला आणि कॉर्पोरेशन सदस्यांना कायद्याने मिळालल अधिकार सुरक्षित राखण्याची हिम्मत दिली.
देशबंधू दास यांच्या मृत्यूनंतर ते बंगालचे प्रतीक झाले. १९२६ मधल्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी स्वागत समितीचे डॉ. विधानचंद्र मंत्री होते. बंगालच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाचे ते संचालक होते. त्यासाठी त्यांना ६ महिन्यांची कैद झाली होती. इ. स. १९३४ मध्ये बंगाल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.
बंगाल नेहमीच संकटांना तोंड देत होता. मुस्लीम लीगच्या जातीय दंगलीनंतर दोन दिवसांत दीड-दोन हजार मृत शरीरांचे अग्निसंस्कार तेथे करण्यात आले. देशाच्या फाळणीनंतर इ. स. १९४८ मध्ये ते बंगालचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात बंगालच्या विकासाची अनेक कार्ये त्यांनी केली. दुर्गापूरचा लोखंड व इस्पातचा कारखाना, काच कारखाना, अॅसिडचा कारखाना, दामोदर घाटी प्रकल्प, मयूराक्षी जलाशय, गंगा बांध प्रकल्प, कलकत्ता महानगर दुग्ध वितरण योजना इ. कार्ये त्यांच्या यशस्वी काळाची साक्ष आहेत.
मुख्यमंत्री असूनही आपला डॉक्टरी पेशा ते अत्यंत निष्ठेने करीत असत. या देशात सर्वांत पहिला मृत्युंजय औषधी बनविण्याचा कारखाना त्यांनी चालू केला. त्यांनी आपले निवासस्थानही देशसेवेला दान केले होते. कधी विश्रांती घेतली नाही. त्यांचा मंत्रच होता की, 'मी त्याच दिवशी विश्रांती घेईन, ज्या दिवशी मृत्यू माझ्या दारी येईल.'
आयुष्याची सतत चाळीस वर्षे ते देशसेवा करत होते. अनेक हॉस्पिटल्सशी ते जोडले गेले होते. हे कार्य पाहून इ. स. १९४४ मध्ये कलकत्ता विद्यापीठात त्यांना 'डी. एस. डी. ची पदवी दिली.
इ. स. १९६१ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ. विधानचंद्र राय यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्पण केला. ८० वर्षांच्या आयुष्यानंतर १ जुलै १९६२ रोजी त्यांच्या जन्म दिवशीच मृत्यूने त्यांना अनंतात विलीन केले.
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - सत्यजीत राय
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - राजीव गांधी
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - सरदार वल्लभभाई पटेल
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - मोरारजी देसाई
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - नेल्सन मंडेला
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. भीमराव आंबेडकर
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - मरुदूर गोपालन रामचंद्रन
-
‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - खान अब्दुल गफार खान
Maecenas vitae mollis risus. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Nunc egestas eget eros iaculis porta. Nulla nisl eros, imperdiet sit amet elementum quis, fermentum non sapien.
Praesent vitae fermentum lacus. Ut suscipit velit porta dui egestas adipiscing. Maecenas pellentesque, lectus at volutpat laoreet, mi elit cursus metus, at fermentum risus neque ut sem. Ut sapien tortor, vestibulum at nibh a, posuere convallis magna.
Mauris dictum, purus non commodo tincidunt, diam turpis mattis leo, id aliquet leo tellus at urna. In placerat pretium magna, nec egestas sapien feugiat vel. Sed ipsum odio, condimentum nec hendrerit feugiat, convallis et dui.
Etiam tempus magna facilisis, faucibus est placerat, egestas turpis. Maecenas vitae mollis risus. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos.
Maecenas dui nibh, dignissim ac ultricies nec, pulvinar in ipsum. Nunc egestas eget eros iaculis porta.