ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे

पोस्ट :  डिसेंबर 31, 2019 04:17 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९५८ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांची थोडक्यात माहिती. 

 

               महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ मध्ये झाला. म. कर्त्यांच्या वडिलांचे नाव केसो पंत होते. लोक आदराने त्यांना 'अण्णासाहेब' म्हणत. ते महाराष्ट्रातील कोकणामधील समुद्रकिनारी असलेल्या निसर्गरम्य मुरुड गावी राहत असत. ते अतिशय काटकसरीने राहणारे, संतांप्रमाणे सामान्य जीवन जगणारे होते. त्यांची आई सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ रँगलर कुटुंबातील स्वाभिमानी स्त्री होती.


           महर्षी कर्वे हे १८ व्या वर्षांपर्यंत वडिलांजवळ राहिले. मुरुड गाव सुंदर, पण तिथले लोक मात्र दरिद्री. ही निर्धनता भारताच्या संस्कृतीच्या विकासाला मात्र बाधक ठरली नाही. तिथल्या रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांसारख्या काही लोकांनी गावाचे नाव प्रसिद्ध केले. महर्षी कर्त्यांना प्रेरणा देणारे तेच होते.


             महर्षी कर्वे यांनी स्वत: शिकवण्या करून स्वत:चे शिक्षण घेतले. त्यांनी भारतामध्ये 'भारतीय महिला विद्यापीठ' स्थापन करून महाराष्ट्रातील महिलांसाठी देशातील पहिली वहिली महान शिक्षण संस्था निर्माण केली. आज मुंबईमध्ये ही मुख्य संस्था आहे व सगळीकडे तिच्या शाखा शाळा-कॉलेजच्या रूपाने पसरल्या आहेत. परंतु १८९८ मध्ये पुण्यापासून तीन-चार मैल दूर हिंगण्याला एका कच्च्या झोपडीवजा घरामध्ये याची स्थापना झाली होती. आज त्याच ठिकाणी करोडो रुपये किमतीच्या मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत. पण तरीही हे मूळ घर । स्मारकाच्या स्वरूपात तिथे सुरक्षित ठेवले आहे.


              म. धोंडो कव्यांचा विवाह वयाच्या १५ व्या वर्षी झाला होता व त्यावेळी त्यांच्या पत्नी राधाबाई नऊ वर्षाच्या होत्या. त्या काळात बालविवाहच प्रचलित होते व समाजाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत होते. पुष्कळशा स्त्रिया बालवयातच विधवा होत असत. मुलं अशक्त असत व लवकरच म्हातारपण येत असे.


          एकदा बडोद्याच्या महाराजांनी ब्राह्मणांना धान्य, वस्त्र व दहा-दहा रुपये दक्षिणा देण्याची घोषणा केली होती. बालक धोंडोचे मनही दक्षिणेसाठी लालचावले. आईला त्याने आपल्या मनातली इच्छा सांगितली, तेव्हा आई भडकलीच, ती म्हणाली, “कोणाकडूनही दान घेण्यासाठी दुसऱ्यासमोर झोळी पसरणाऱ्या घरात तुझा जन्म नाही झालेला बाळा!"


            लहान वयात म. कर्वे अत्यंत भित्रे व हट्टी स्वभावाचे होते. कोकणात समुद्रकिनारी राहूनही त्यांना पाण्याची जाम भीती वाटत असे. म्हणून एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांचे हात-पाय बांधून जबरदस्तीने त्यांना पाण्यातच टाकले. त्यांनी आरडाओरडा करून 'मेलो, मेलो' ओरडून रस्त्यावरच्या लोकांना एकत्र केले. लोकांनी बाहेर काढल्यावर घरी येऊन एका अंधाऱ्या खोलीत लपून बसले; पण पुढे मात्र याच भित्र्या बालकाने साऱ्या समाजाला अत्यंत निडरपणे तोंड देऊन जुन्या, जाचक परंपरा, रूढी, रीतींचा अव्याहत सामना केला आणि महर्षी पद मिळविले.


          हा बालक हातात तक्ता घेऊन गावातल्या प्राथमिक शाळेत जाऊ लागला. बोरूने त्यावर लिहायला शिकला. इथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर सोमण गुरुजींच्या सरकारी शाळेत ते सहावीपर्यंत शिकले. सहावीच्या परीक्षेसाठी गावाहून साताऱ्याला चालत, वाटेतील डोंगर-दऱ्या तुडवत पोहोचले; पण तेथे गेल्यावर 'लहान वय' असे सांगून तेथील परीक्षाधिकारी महोदयांनी परीक्षेला बसू दिले नाही. शेवटी नाइलाजाने निराश होऊन परत फिरले. नंतर हीच परीक्षा त्यांनी कोल्हापूरला जाऊन पास केली.


        त्या काळात इंग्रजीचे महत्त्व फार! पुढे काही करायचे असेल तर इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळेच शक्य होत असे. म्हणून म. कर्त्यांनी इंग्रजीचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. त्यासाठी रत्नागिरीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला पण शरीरप्रकृतीने साथ नाकारल्यामुळे आजारी पडले. त्यामुळे गावी परत लागले. आता तिथे ५ रुपये मासिक पगारावर शिक्षकाचे काम सुरू केले त्याचबरोबर स्वत:चा अभ्यासही चालू ठेवला. रोज सात तास शाळेत शिकवाय आणि घरी घेऊन स्वत:चा इंग्रजीचा अभ्यास करायचा. या प्रकारे काही कमवून एका दोस्ताबरोबर मुंबईला आले व विल्सनमध्ये स्कूलमध्ये भरती झाले. इ. स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यावर १८८४ मध्ये एलफिन्स्टन कॉलेजात गणित विषय घेऊन बी. ए. झाले.


          आपल्या गावाच्या 'सुधार निधीला' मदत करण्यासाठी आता त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली होती. गरीब विद्यार्थ्यांना ते पैशाच्या रूपानेही मदत करीत असत. आपल्या उत्पन्नातील ५% फंड केवळ सामाजिक कार्याला दान देण्यासाठीच त्यांनी ठेवला होता. एवढेच नाहीतर आपल्या समविचारी मित्रांच्या मदतीने इ. स. १८८८ मध्ये 'मुरुड फंड' चालू करून त्यामधून मुरुडमध्ये हायस्कूलची स्थापना केली. आता ते समाजसेवेमध्ये दप्पट उत्साहाने उतरले होते.


           ऑगस्ट १८९१ मध्ये त्यांच्या पत्नी राधाबाई दिवंगत झाल्याचे पत्र त्यांना कोकणातून आले. हा तर त्यांच्यासाठी वज्राघात होता. कारण आजपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला सुरुवातच झाली नव्हती. पण म्हणतात, वाईटातून काही तरी चांगलेच घडते. त्यांच्या बाबतीत तसेच झाले. या दु:खामुळेच त्यांना विधवांच्या उद्धाराची प्रेरणा मिळाली. विधवांचा उद्धार आणि स्त्रियांचे शिक्षण । या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. तेव्हा म. कर्वे मुंबईला होते. याच दिवसांत प्रो. गोपाळ कृष्ण गोखलेंनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताच्या प्राध्यापक पदासाठी निमंत्रण दिले. मुंबईमध्ये ते शाळा, शिकवण्या यात अध्यापन करीत होते. तेथ त्याना सुमारे ३०० रु. महिना मिळकत होती. पण आता त्यांना लो. टिळ' आगरकरसारख्या भारतीय नेत्यांच्या शिक्षण संस्थेत अध्यापनकार्य कराया मिळणार होते म्हणून ते ध्येयाने भारून केवल ध्ययाने भारून केवळ ७५ रु. महिना वेतनावर काम करण्यासाठी १५ नोव्हेंबर १८९१ पासून गणिताचे अध्यापक म्हणून रुजू झा त्यांची कामाची तळमळ, सेवेची आवड बघन विद्यालयाच्या व्यवस्था समितीमध्ये त्यांची आजन्म सदस्य म्हणून नेमणूक झाली.


          आता मात्र म. कर्वे खऱ्या अर्थाने सुधारकांच्या वर्तुळात कार्यरत झाले होते. ते तरुण होते. त्यांनाही जीवनसाथीची आवश्यकता होती. त्यांच्या मनातले विचार मात्र वेगळ्याच दिशेने वाहत होते. समाजातील बाल-विवाह, विधवा यांची स्थिती त्यांना दिसत होती. त्यांच्या हृदयात माणुसकीच्या वेदना जागत होत्या. कारण बालविधवांसाठी केवळ अंधारकोठडीच्या नरकयातनाच होत्या. 'लग्न' या शब्दाचा अर्थही जिला माहीत नाही, अशा विधवा बालिकेचे केशवपन होत असे. तिचे दर्शनही अपशकुनी मानले जाई. युवक कर्त्यांनी जेव्हा आपल्या एका मित्राच्या पत्नीला अशा विकल स्थितीत मरताना पाहिले, तेव्हा त्यांना कळून चुकले की फक्त बोलून, भाषणे ठोकून यावर काहीही परिणाम होणार नाही. प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे.

            सरकारने विधवा विवाहाला अनुमती दिली होती. पण समाजाने त्याचा स्वीकार करणे महत्त्वाचे होते. नातेवाईक, सगेसोयरे, साथीसंबंधी, दोस्त सगळ्यांचीच भीती वाटत होती. शेवटी कर्त्यांच्या मनाचा निश्चय झाला. त्यांनी कोणालाही न कळविता, कोणाचाही सल्ला घेतल्याशिवाय स्वत: विधवेशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पंडिता रमाबाईंच्या 'शारदा सदन'मध्ये विधवांना शिक्षण प्रशिक्षण दिले जाते हे माहीत होते. तिथे त्यांचे मित्र नरहर पंत यांची लहान भगिनी गोदूबाई (गोदावरी) शिकत होती. गोदूबाईचा पहिला विवाह वयाच्या आठव्या वर्षी झाला होता व केवळ तीनच महिन्यांनी ती विधवा झाली होती. या गोदावरीशी १३ मार्च १८९३ रोजी पुण्यातील प्रसिद्ध विद्वान डॉ. भांडारकर यांच्या घरी म. कर्त्यांनी लग्न केले. महाराष्ट्रातील अनेक अग्रणी समाजसुधारक या समयी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. आता गोदूबाईची ‘सौ. आनंदीबाई धोंडो कर्वे' झाली.


         लग्न तर क्रांतीच्या जिद्दीने झाले, पण समाजाची मनोवृत्ती एकदम कशी बदलणार! समर्थकांपेक्षा विरोधकच अधिक. या विवाहाने संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठले. मुरुड ग्रामस्थांनी तर त्यांच्यावर बहिष्कारच घातला. संबंधी, नातेवाइकांना भेटणेही मुश्कील झाले. अस्पृश्यांप्रमाणेच समाज त्यांना वागवू लागला. आनंदीबाईच्या वडिलांनाही एक रुपया सामाजिक दंड द्यावा लागला.      

    
        हा असा विरोध होणार हे तर त्यांना माहीतच होते. चुकीच्या सामाजिक परंपरांना मुळातच उखडून टाकण्यासाठी तसेच कठोर परिश्रम हवेत याची दोघांनाही जाणीव होती. आता परिस्थितीला तोंड देण्यासाठी “एकास दोन भले' म्हणून तयार झाले आणि समाजसेवाकार्यात उडी घेतली. आनंदीबाईंनी नागपाल डफरीन हॉस्पिटलमध्ये मिडवाइफ नर्सिंगचे शिक्षण घेतले. इकडे म. कर्व्यांनी पुण्यामध्ये 'विधवा समितीची' स्थापना केली. विधवांची स्थिती सुधारणे, हाच या समितीचा उद्देश होता. या आश्रमाला आपली सगळी जमविलेली माया दान दिली. मग आणखी संपत्ती उभी करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या शहरांमधून व गुजरातमध्ये फिरू लागले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपली पाच हजार रुपयांची विमा पॉलिसीसुद्धा आश्रमाला दान केली.


          म. कर्त्यांचे विचारचक्र तीव्र गतीने फिरत होते. महिलांचा उद्धार केवळ विधवा विवाहाशी थांबत नाही, तर त्यासाठी इ. स. १९०० मध्ये पुण्यापासून चार मैल दूर असलेल्या हिंगण्याला त्यांनी 'अनाथ बालिका आश्रम' स्थापन केला. इ. स. १९०८ मध्ये ‘निष्काम कर्ममठ' संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा मूलमंत्रच हा होता की, 'समाजसेवा हाच आमचा ईश्वर आहे आणि त्याची सेवा करण्यातच धन्यता मानणे ही आमची ईश्वरावरची श्रद्धा आहे.'


         वस्तुतः सुरुवातीला महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची कल्पना त्यांच्या मनात नव्हती. जेव्हा त्यांचे अनाथ महिलांच्या प्राथमिक शिक्षणाचे कार्य संपन्न झाले, यशस्वी होत राहिले; तेव्हा त्यांच्या वाचनात एका जपानी पुस्तकाद्वारा माहिती आली की, जपानमध्ये महिलांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. या कल्पनेने त्यांच्या मनात मूळ धरले. त्यांच्या एकूण सामाजिक कार्यात या नव्या विचाराचे रोपटे फोफावू लागले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते इतके लोकप्रिय होते, तरीही त्यांनी इ. स. १९१५ मध्ये तिथली नोकरी सोडली.


         पुढे तीन संस्थांना मिळून एकच नाव दिले-'महिला आश्रम'. इ. स. १९१६ मध्ये 'भारतीय महिला विद्यापीठ' या संस्थेची घोषणा केली गेली. यासाठी फंड हवा म्हणून त्यांनी पुन्हा एकदा झोळी हातात घेऊन भ्रमंती सुरू केली. ही त्यांची समर्पण भावना बघून सर्वप्रथम रावबहादूर गोखलेंनी ६ एकर जमीन संस्थेला दान दिली. डॉ. भांडारकर हे सुरुवातीपासूनच कर्त्यांचे साहाय्यक होते. संस्थेचे पहिल अध्यक्ष तेच झाले. जेव्हा या संस्थेने विद्यापीठाचे रूप घेतले तेव्हा ते प्रथम कुलपती झाले. ४ वर्षांनंतर जेव्हा संस्थेच्या फंडात केवळ २ लाख, १६ हजार रुपये उरले होते तेव्हा एक चमत्कारच झाला. मुंबईचे एक विख्यात उद्योगपती सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ इ. स. १९२० मध्ये १५ लाख रुपये निधी दान दिला.

         कारण त्यांना ही महिला विद्यापीठाची कल्पना मनापासून भावली होती. परिणामस्वरूप या संस्थेला 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ' नाव दिले गेले. ठाण्याचे विनायकराव यांनीही ५० हजार रुपये देणगी दिली. इ. स. १९४२ मध्ये विद्यापीठाची रजत जयंती साजरी केली गेली. डॉ. राधाकृष्णन् समारंभाचे सभापती होते. १९५२ च्या समारंभाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी होते. इ. स. १९४८ मध्ये सरकारने या विद्यापीठाला मान्यता दिली आणि १९५१ मध्ये भारत सरकारने इतर विद्यापीठांच्या समान दर्जा या महिला विद्यापीठाला दिला.


           इ. स. १९३१ मध्ये म. कर्वे या कार्याला देणग्या मिळविण्यासाठी वयाच्या ७१ व्या वर्षी विदेशांमधून फिरले. अमेरिका, जपान, आफ्रिका, इंग्लंड आदी देशांत गेले. त्यांनी डॉ. आइन्स्टाइनसारख्या महान व्यक्तीचीही भेट घेतली. जपानमध्ये तीन आठवडे राहून त्यांनी महिला विद्यापीठाचे कामकाज पाहिले. डॉ. धोंडो केशव कर्त्यांना आधुनिक युगाचे ‘महर्षी कण्व' म्हणत असत. महाभारतातल्या कण्व मुनींनी एकाच अनाथ, परित्यक्ता शकुंतलेला नवजीवन दिले होते. पण या आधुनिक महर्षी कर्त्यांनी तर समाजातील अगणित परित्यक्ता व विधवांना नवजीवनाची वाट दाखवली. आपल्या पायावर उभे करून, स्वाभिमानाने जगायला शिकविले. त्यांच्यामध्ये समाजसेवेचा गुण प्रथमपासून होता. गावात कोणाकडे पत्र आले तर वाचून दाखवीत.

            गावातील मंदिरात बसून लोकांना वर्तमानपत्र वाचून दाखवत. त्यांचे गावातील प्राथमिक गुरू श्री. सोमण गुरुजींनी त्यांच्यामध्ये ही प्रेरणा जागविली. साधी राहणी, उच्च विचारसरणी, स्वच्छ चारित्र्य, समाजसेवी वृत्ती आणि अहंकाराचा अभाव हे सर्व म. कर्त्यांचे गुण ही सोमण गुरूजींचीच देणगी आहे. स्फटिकाप्रमाणे पारदर्शी चारित्र्यामुळेच विधवांच्या शिक्षणाचे कार्य ते इतक्या सहज सुलभतेने यशस्वीरीत्या करू शकले. हा त्यांचा निश्चितच एक सर्वश्रेष्ठ असा महान गुण होता. महाराष्ट्र हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. आपल्या जीवनाचे एक ध्येय निश्चित करून त्यावरच ते ठाम राहिले. एका जागी स्थिर राहिले. तरीही त्यांच्या कार्याच्या यशाची आभा साऱ्या भारतवर्षात पसरली. ते माणसामाणसांत कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नसत. म्हणूनच त्यांनी हा विचार कार्यान्वित करण्यासाठी इ. स. १९४४ मध्ये 'समता संघ' स्थापन केला होता.


         विधवा जागृती, स्त्री शिक्षण याबरोबर हरिजन महिलांच्या उत्थानासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. या सर्वांमध्ये त्यांची अर्धांगिनी आनंदीबाई सावलीपर त्यांच्याबरोबर होती. त्यांनी स्वत:ला त्यांच्यामध्ये पूर्णतः समर्पित केले होते. समर्पणात इ. स. १९५० मध्ये त्या विलीन झाल्या.


         त्यांच्या या महान अशा क्रांतिकारक समाजसेवेचा परिणाम म्हणून इ.स १९४२ मध्ये काशी हिंदू विश्वविद्यालयाने धोंडो केशव कर्त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ ही मानद उपाधी प्रदान केली. इ. स. १९५० मध्ये भारत देशवासीयांनी 'महर्षी' म्हणून सन्मान दिला. इ. स. १९५५ मध्ये भारत सरकारने ‘पद्मविभूषण' आणि इ. स. १९५७ मध्ये मुंबई विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लॉ' या पदव्यांनी गौरविले.


        महर्षी डॉ. कर्वे १०४ वर्षे जगले. इ. स. १९५८ मध्ये देशभरात त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. तेव्हा मुंबईमध्ये एका सभेत पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले की, 'आपल्या जीवनाने प्रेरणा व स्फूर्ती मिळते. एक मनुष्य काम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणजे आपले आयुष्य आहे. मी आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे.'


        देशरत्न डॉ. राजेंद्रप्रसाद या प्रसंगी म्हणाले की, 'दृढनिश्चयी सामान्य माणूस अत्यंत विपरीत परिस्थितीत किती महान कार्य करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. कर्वे यांचे आयुष्य होय.' 
        या प्रसंगी आकाशवाणीवरून आपल्या प्रसारणात त्यांनी म्हटले-'इच्छा तिथे मार्ग, हा माझा मंत्र आहे. जीवनात मी नवे मार्ग धुंडाळत गेलो; म्हणूनच जीवनाचा आनंद लुटत राहिलो.'


         दि. २६ जानेवारी १९५८ रोजी भारत सरकारद्वारा भारताचा अत्युच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन त्यांना भूषविले. पदक देऊन त्यांचा सन्मान केला. 


         नियतीकडून मिळालेल्या १०४ वर्षांच्या दीर्घायुष्याच्या क्षणाक्षणाचा सदुपयोग समाजसेवेसाठी करून, प्रत्येक पिढीसाठी निखळ समाजसेवेचे निष्काम कर्मयागा उदाहरण देऊन हे महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी आपला इहलोकीची यात्रा संपवून अनंतात विलीन झाले.