ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 05:33 PM



जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्मयातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे. 40 वषीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. त्यांच्या मागे पत्नी आई, वडील, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.