ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातल्या २ शहरांमधल्या मेट्रोसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 07:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातल्या २ शहरांमधल्या मेट्रोसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा

शहर : नागपूर

महाराष्ट्रातल्या दोन शहरांमधल्या मेट्रोबद्दल मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. नागपूर आणि नाशिकमधल्या मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात या शहरांमधलं मेट्रोचं जाळं आणखी भक्कम करण्यात येणार आहे.

नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केलेल्या या घोषणेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी म्हटलं की, अभिनंदन नाशिक! अभिनंदन नागपूर!, आम्हाला आनंद आहे की भारत सरकारने आमच्या अभिनव दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे आणि नाशिक मेट्रोच्या मॉडेलला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारले आहे. इतकेच नव्हे तर इतर मेट्रो शहरांमध्येही नाशिक मेट्रो मॉडेल राबविण्यात येणार आहे.

दुसरीकडे भारतीय रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. भारत सरकार 2030 पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणारेय. तर 2023 पर्यंत ब्रॉडग्रेजचं शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

मागे

Budget 2021: तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
Budget 2021: तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आज बजेट २०२१ सादर केलं. जुन्या गाड्या रस्....

अधिक वाचा

पुढे  

ग्रामीण भागाचं चित्र बदलणार, आता संपूर्ण देशात लागू होणार ही योजना
ग्रामीण भागाचं चित्र बदलणार, आता संपूर्ण देशात लागू होणार ही योजना

ग्रामीण भाग शासनाच्या प्राधान्यक्रमात असल्यामुळे, येत्या आर्थिक वर्ष 2021-22 च....

Read more