ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Petrol & Diesel: पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2021 01:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Petrol & Diesel: पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

शहर : देश

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel price) वाढत्या दरांमुळे चिंतेत असलेल्या सामान्यांना मोदी सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार (Cess tax) लावण्याची घोषणा केली.

त्यानुसार पेट्रोलवर 2.5 रुपयांचा तर डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस लागणार आहे. त्यामुळे शंभरीनजीक येऊन ठेपलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी आणि स्पेशल एक्साईज ड्युटी दे दोन कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर वाढीव सेसचा काही परिणाम होणार नाही, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता केंद्राच्या या निर्णयावर विरोधक आक्रमक होणार का, हे पाहावे लागेल.

LIC च्या प्रशासकीय नियमांत बदल करण्यासाठी विधेयक

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बाजारपेठेत IPO आणण्यासाठी केंद्र सरकारला LIC च्या प्रशासकीय नियमांत काही बदल करावे लागतील. त्यानंतरच केंद्र सरकारला एलआयसीमधील हिस्सेदारी विकता येईल. त्यामुळे आता केंद्र सरकार यासाठी संसदेत सुधारणा विधेयक मांडणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.

जाणून घ्या काय स्वस्त?, काय महाग?

काय स्वस्त?

पोलाद- कस्टम ड्युटीत सूट मिळणार

तांबे- तांब्यावरील कस्टम ड्युटीत सूट

टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार

केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार

सोने-चांदी – कस्टम ड्युटी पुन्हा कमी करणार

चामड्याच्या वस्तू, गारमेंट- कस्टम ड्युटी कमी करणार

काय महाग?

अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल-इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर

ऑटो पार्ट- काही गोष्टीवर कस्टम ड्युटी वाढवली

जेम्स स्टोन- कस्टम ड्युटी वाढवली

मागे

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार
Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

सर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) प्रारंभिक खुल्या ....

अधिक वाचा

पुढे  

अर्थसंकल्पात रेल्वे सुसाट, तब्बल 1.10 हजार कोटींची तरतूद, बुलेट प्रकल्प स्पीडने धावणार?
अर्थसंकल्पात रेल्वे सुसाट, तब्बल 1.10 हजार कोटींची तरतूद, बुलेट प्रकल्प स्पीडने धावणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitaraman ) यांनी आज 2020-21 चा अर्थसंक....

Read more