ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Budget 2021 PDF Download | अर्थसंकल्पाचं PDF Documents आता Online, मोबाईलवर डाऊनलोड करण्याची पद्धती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 06:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Budget 2021 PDF Download | अर्थसंकल्पाचं PDF Documents आता Online, मोबाईलवर डाऊनलोड करण्याची पद्धती

शहर : देश

यंदाचा अर्थसंकल्प ( Union Budget 2021 ) नोकरदार वर्गासाठी दिलासादायक नसला, तरी तो काही अर्थाने वेगळा होता. 2021 चा अर्थसंकल्प पहिल्यांदाच पेपरलेस आहे. म्हणजेच, हा अर्थसंकल्प डिजीटल स्वरुपात कुणालाही पाहता येणार आहे. यासाठी सरकारनं मोबाईल अॅप बाजारात आणलं आहे, ( Union Budget Mobile App ) ज्यावर तुम्ही डिजीटली हा अर्थसंकल्प पाहु शकता. Android आणि iOs स्मार्टफोनसाठी गूगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवर खास अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प संसदेत सादर केला, त्याच्या प्रती तुम्हाला या अॅपवर वाचायला मिळणार आहेत.

केंद्र सरकारनं प्रतिकात्मकहलवा सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी या Union Budget Mobile App ची घोषणा करण्यात आली. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही अर्थमंत्र्यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प डिजीटली मिळवू शकता. याशिवाय, पुराव्यादाखल संसदेत मांडण्यात आलेली आकडेवारी आणि कागदपत्रंही तुम्ही पाहू शकता. हे अॅप iOS 10 आणि Android च्या Version 5 वरही व्यवस्थित चालतं. NIC म्हणजेच नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरनं DEA म्हणजेच आर्थिक व्यवहार विभागाच्या मदतीनं हे अॅप विकसित केलं आहे.

आता प्रश्न येतो, पण अर्थसंकल्पाचे PDF Document मिळवण्यासाठी Union Budget Mobile App डाऊनलोड तरी कसं करायचं?

 

तुम्ही Android मोबाईल वापरत असाल तर Google Play Store किंवा iPhone वापरत असाल तर Apple App स्टोरला जा

 

या अॅपमध्ये Union Budget Mobile सर्च करा

 

लिस्टमधून NIC द्वारे विकसित केलेलं Union Budget Mobile निवडा

 

त्यानंतर Install चा पर्याय निवडा

 

– www.indiabudget.gov.in या संकेतस्थळावरुनही तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता

Union Budget Mobile अॅपची वैशिष्ट्य काय?

 

-इतर अॅपप्रमाणं या अॅपवर लॉगिन वा नोंदणी (Registration) करण्याची गरज नाही, तुम्ही अॅप डाऊनलोड केल्यानंतर थेट वापरु शकता

 

या अॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजी असे भाषांचे 2 पर्याय आहे, तुमचं ज्या भाषेवर प्रभुत्त्व आहे, तो पर्याय तुम्ही निवडू शकता

 

अर्थसंकल्पातील कागदपत्र डाऊनलोड करण्यासह तुम्ही या कागदपत्रांच्या थेट प्रिंट देऊ शकता, झुम करुन यातील गोष्टी पाहू शकता.

 

याशिवाय, पुस्तकाचं पान पलटल्याप्रमाणं तुम्ही कागदपत्र एका सरळ रेषेत पाहू शकता

 

अर्थसंकल्पाबाबतची सगळी कागदपत्र पाहण्यासह, तुम्ही ही PDF स्वरुपात डाऊनलोड करु शकता.

 

 

मागे

Budget 2021 मध्ये खातेधारकांसाठी Good News, बँक बुडाली तर…
Budget 2021 मध्ये खातेधारकांसाठी Good News, बँक बुडाली तर…

केंद्र सरकारने 2021 च्या अर्थसंकल्पात बुडालेल्या बँकांच्या कर्जाचे व्यवस्थ....

अधिक वाचा

पुढे  

Education Budget 2021: देशातील सैनिक स्कूलची संख्या वाढणार, नवीन 100 सैनिक स्कूल कशी सुरु होणार?
Education Budget 2021: देशातील सैनिक स्कूलची संख्या वाढणार, नवीन 100 सैनिक स्कूल कशी सुरु होणार?

नव्या शैक्षणिक धोरणांच्या आधारे देशातील 15 हजार शाळांचा विकास करण्यात येणा....

Read more