ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Budget 2021: PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा, 64184 कोटी रुपये होणार खर्च

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2021 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Budget 2021: PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा, 64184 कोटी रुपये होणार खर्च

शहर : देश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी आरोग्य सेवेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान स्वावलंबी स्वस्थ भारत मिशन योजनेची घोषणा केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना तब्बल 64184 कोटींची असणार आहे. अधिक माहितीनुसार, ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानापेक्षा वेगळी असणार असून या योजनेची किंमतसुद्धा वेगळी असणार आहे. ज्यामझ्ये प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य युनिट स्थापिक करण्यात येईल.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील आरोग्याचा डेटा गोळा करुन त्यानुसार लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी एक ब्लू प्रिंट तयार करेल. खरंतर, सरकार अशीच एक डिजिटल हेल्थ मिशन योजना चालवत आहे. पण ही योजना वेगळी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्ये म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा देण्याची सरकारची तयारी आहे.

याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, PM आत्मनिर्भर स्वस्थ्य भारत मिशन योजनेसाठी तब्बल 64184 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य युनिटची स्थापना केली जाईल. इतकंच नाही तर आणखी दोन कोरोना लसी लवकरच येणार आहेत. यामुळे कोव्हिड लसीसाठी 35 हजार कोटींचा निधी देण्यात आला.

आरोग्य सेक्टरसाठी बजेटमध्ये 137 टक्के वाढ करण्यात आली आहे. याआधी हा निधी 94000 कोटी रुपये होता. पण आता यामध्ये वाढ करण्यात आली असून तो आता 22 हजार कोटी असणार आहे. यासोबतच डेव्बलपमेंट फाइनँशिअल इंस्टिट्यूट सुरू करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

मागे

Budget 2021: मोदी सरकारचा शेतकऱ्यांवर Focus, 5 योजनांवर अधिक भर
Budget 2021: मोदी सरकारचा शेतकऱ्यांवर Focus, 5 योजनांवर अधिक भर

कोरोना, लॉकडाऊन, अवकाळी पाऊस, महापूर, चक्रीवादळ अशा अनेक संकटातून सावरत असले....

अधिक वाचा

पुढे  

Budget 2021: कोरोना लशीसाठी इतक्या कोटींची तरतूद, अर्थमंत्र्यांची घोषणा
Budget 2021: कोरोना लशीसाठी इतक्या कोटींची तरतूद, अर्थमंत्र्यांची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर करण्यास सुरुवात केली आह....

Read more