By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 30, 2019 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : लातूर
लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वीच लाच घेणाऱ्या नायब तहसीलदाराला चतुर्भुज केल्यानंतर आता एक पोलीस कर्मचारीही एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. पोलीस नाईक नारायण दत्तू गरड असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिड हजार रुपयांची लाच स्वीकारताना गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण दत्तू गरड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यात कहर म्हणजे लाचेची रक्कम मिळेपर्यंत तक्रादाराचा मोबाईलच या बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः कडे ठेवला होता.
लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून निघालेल्या ३०७ च्या गुन्ह्यातील अटक वॉरंटनुसार सदर आरोपीला पोलीस कस्टडीत न ठेवता तात्काळ न्यायालयात हजर करण्याच्या कामासाठी लाच मागण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे लाचेची रक्कम मिळेपर्यंत तक्रारदाराचा मोबाईल नारायण गरड याने स्वतःकडेच ठेवून घेतल्याचे लाचलुचपत विभागाने स्पष्ट केलंय. नारायण गरड याने दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५०० रुपये लाच घेताना एका हॉटेलमध्ये सापळा लावून सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयआयटी मुंबईतून दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध ....
अधिक वाचा