ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयआयटी मुंबई घडवणार विद्यार्थ्यांतील उद्योजक

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयआयटी मुंबई घडवणार विद्यार्थ्यांतील उद्योजक

शहर : मुंबई

आयआयटी मुंबईतून दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध कंपन्या नोकऱ्या देतात त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये उत्तम काम मिळते, चांगला पगार मिळतो. आता आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छोटे कोर्सेस व्यापाराशी संबंधित बाजारपेठेची माहिती आणि संशोधनासाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आयआयटी मुंबईतून दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध कंपन्या नोकऱ्या देतात. त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये उत्तम काम मिळते चांगला पगार मिळतो. आता आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छोटे कोर्सेस व व्यापाराशी संबंधित बाजारपेठेची माहिती व संशोधनासाठी विविध कंपन्या सोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

आयआयटी मुंबईतून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात त्यांच्यातील हुशारीची पारख करून अनेक देशी विदेशी कंपन्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना देतात. आयआयटी मुंबईच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत असल्या तरी आता उद्योजक घडवण्याकडे लक्ष देण्याचा निर्णय आयआयटी मुंबईने घेतला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक समस्या परवानग्या आर्थिक पाठबळ लागते. उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात अशा मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आयआयटी मुंबईने जे माझी विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाले आहेत. त्यांची मदत घेऊन एक विशेष उपक्रम हाती घेतलाय. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व छोटे कोर्सेस चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उत्तीर्ण विध्यार्थी यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशी-विदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माजी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबर आयआयटी मुंबई विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून घेणार आहे. संशोधनात अधिक लाभ सर्वसामान्यांना व्हावा यासाठी या मोहिमेवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईचे नवनियुक्त संचालक सुभासिस चौधरी यांनी दिलीय. चौधरी यांनी प्रथमच आयटी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयआयटी मुंबईचे अकॅडमी अँड इन्फ्रास्ट्रक्चर अफेअरचे प्रमुख प्राध्यापक ए के सुरेश फायनान्स अँड एक्स्टर्नल असरचे प्राध्यापक पी एम मुजुमदार उपस्थित होते.

मागे

महिलांना सैन्यात एन्ट्री खुली...
महिलांना सैन्यात एन्ट्री खुली...

भारतीय सेनेत सैनिक म्हणून महिलांनाही प्रवेश खुला झाला आहे. भारतीय सेनादलात....

अधिक वाचा

पुढे  

मोबाईल तारण ठेवून लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात
मोबाईल तारण ठेवून लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात

लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वीच लाच घेणाऱ्या ना....

Read more