ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिलांना सैन्यात एन्ट्री खुली...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महिलांना सैन्यात एन्ट्री खुली...

शहर : मुंबई

भारतीय सेनेत सैनिक म्हणून महिलांनाही प्रवेश खुला झाला आहे. भारतीय सेनादलात पहिल्यांदाच महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. ही प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी पद्धतीनं पार पडणार आहे. सेनादलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिलांना सेनादलात प्रवेश देण्याची घोषणा करून त्यासंबंधी पावलं उचलण्यास सुरूवात केली होती. तसेच जानेवारी महिन्यात पहिल्यांदा सेनेच्या पोलीस दलात महिलांना प्रवेश देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता सेनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. मिलिट्री पोलीस या पदासाठी महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. या भरतीसाठी आजपासून अर्थात २५ एप्रिल २०१९ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल. उत्सुक तरुणी आपला अर्ज ८ जून २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतात.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १०० पदं भरण्यात येणार आहेत. साधारण एकूण ८०० महिलांची 'मिलिट्री पोलीस' या पदावर नियुक्ती केली जाईल. यामध्ये प्रत्येक वर्षाला ५२ महिलांची निवड होईल. भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही १७ ते २१ वर्ष असावं. तर, शारिरीक क्षमतेमध्ये उंची १४२ सेमी, तर वय १७-२१ दरम्यान असावं. तसेच, शारिरीक क्षमतेमध्ये उंची १४२ सेमी, तर वय १७-२१ दरम्यान असावं. तसेच, उमेदवार प्रत्येक विषयात ३३-३३ टक्के किंवा एकूण ४५ टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण असावी, अशी अट आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती सेनादलाच्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर देण्यात आलीय. 

पुढे  

आयआयटी मुंबई घडवणार विद्यार्थ्यांतील उद्योजक
आयआयटी मुंबई घडवणार विद्यार्थ्यांतील उद्योजक

आयआयटी मुंबईतून दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध ....

Read more