By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुका काळात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी मुंबई शहर व उपनगरातील सुमारे 10 हजार 500 हून अधिक समाजकंटकांवर विविध प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये काही जणांना तडीपारीच्या नोटिस बजावण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरतील 36 विधानसभा मतदारसंघात त्यादृष्टीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी उपायुक्त व अप्पर आयुक्तांकडून बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार , खून मारामारी संघटित गुन्हे आदि प्रमाणात सहभागी असलेल्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यांच्यावरील गुन्हयाच्या स्वरूपाप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले. जवळपास 10 हजार 500 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची सूचना अधिकार्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शांततेचा भंग करणारे , सोशल मीडियाव्दारे अफवा पसरविणार्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
काही वेळेस क्षुल्लक डोके दुखी सर्दी पडस यासाठी आपणाला गोळ्या घेऊन उपचार ....
अधिक वाचा