ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

११ वर्षीय मुलीचा बाल्कनीतून पडल्याने मृत्यू

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 07:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

११ वर्षीय मुलीचा बाल्कनीतून पडल्याने मृत्यू

शहर : पुणे

           पुणे : पिंपरी-चिंचवड या भागातील पिंपळे गुरव परिसरात पहाटेच्या सुमारास पाचवीत शिकणार्‍या एका ११ वर्षीय मुलीचा बाल्कनीतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या मुलीच्या दोन्ही किडनी निकामी असल्याने या आजाराला कंटाळून तिने हा निर्णय घेतला असावा असा संशय पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

            गौरी राऊत (वय ११) असे त्या बाल्कनीतून पडलेल्या मुलीचे नाव आहे. जेव्हा ती तिसर्‍या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडली तेव्हा पहाटेची वेळ होती. यावेळेस एका व्यक्तीने रक्तबंबाळ झालेली तिची अवस्था पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्वरित त्या व्यक्तीने तिसर्‍या मजल्यावर राहत असलेल्या तिच्या कुटुंबियांच्या घरचा दरवाजा ठोठावत सगळ्यांना झोपेतून उठवून या घटनेची माहिती दिली. तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता, तोपर्यंत तीने आपले प्राण सोडले होते.

           पोलीसांच्या माहितीनुसार, गौरी राऊत या मुलीच्या दोन्ही किडण्या निकामी होत्या तसेच तिच्यावर उपचार सुरू होते. ती आपल्या शाळेच्या सर्व मित्र-मैत्रिणींपासून दुरावल्याने नैराश्य झाली होती. यातूनच तीने आत्महत्या केली असावी असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. 

मागे

अंमली पदार्थांच्या तस्करीत 9 जणांना अटक
अंमली पदार्थांच्या तस्करीत 9 जणांना अटक

       नवी दिल्ली :  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अंमली पद....

अधिक वाचा

पुढे  

जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन ठार
जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन ठार

        जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाब....

Read more