ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बुधवार पेठेतील रेडलाईट एरियात कोंबिग ऑपरेशन १८ मुलींची सुटका

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बुधवार पेठेतील रेडलाईट एरियात कोंबिग ऑपरेशन १८ मुलींची सुटका

शहर : पुणे

  बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोबिंग ऑपरेशन करुन १८ मुलींची सुटका केली.  याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ९ घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जहाना मोहंमद रजा शेख, रुपा अब्दुलखान (दोघी. रा. माचिस बिल्डिंग), मैली टिकातमांग (रा. मर्गी गल्ली), तारा बकतलतमांग, (शिमला साथमनतमांग), यास्मीन मोबीन शेख (तिघी. रा. वेलकम बिल्डिंग, बुधवार पेठ), काजल गोरे तमांग आणि गंगाबाई कांबळे (दोघी. रा. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी शनिवारी मिळाली. त्यानंतर परिमंडळ एक मधील १५ पोलीस अधिकारी व ७० पोलीस महिला, पुरुष कर्मचारी त्यांनी सायंकाळी बुधवार पेठेतील सर्व परिसरात कोबिंग ऑपरेशन केले. संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यात या ९ घरमालकांकडे १८ मुली मिळून आल्या.  या पीडित मुलींकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून घरमालक, मालकिणी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे व त्यांच्या कमाईतील ५० टक्के पैसे घरमालक घेत असल्याचे सांगितले़. त्यानंतर या १८ मुलींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या त्यांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. फरासखाना पोलिसांनी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांची वैयक्तिक माहिती असलेला डाटा तयार केला आहे. त्यात त्यांच्या फोटोसह आधार कार्ड व अन्य माहिती नमूद केली आहे. यावरुन बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय चालत असलेल्या सर्व इमारतींमधील सर्व घरांमध्ये जाऊन पोलिसांनी तपासणी केली. त्यात पोलिसांकडे नोंद नसलेल्या १८ मुली सापडल्या, असे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले .

 

 

मागे

परवाना रद्द केल्याने केमिस्टकडून महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या.
परवाना रद्द केल्याने केमिस्टकडून महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या.

 पंजाबच्या खरडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलविंदर सिंह नावाच्या....

अधिक वाचा

पुढे  

सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी सहायक अभियंता एस.एफ. काकुळतेला अटक
सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी सहायक अभियंता एस.एफ. काकुळतेला अटक

सीएसएमटी स्थानकाजवळील पूल दुर्घटनेत 6 निष्पापांचा नाहक बळी गेला. या दुर्घट....

Read more