By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापुरात नीता ट्रॅव्हल्समधून १९ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. नाकाबंदीदरम्यान कारवाई करत असताना ही रोकड सापडली आहे. ही बस गोव्याहून मुंबईला निघाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संतोष कुमार पटेल या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे नाकाबंदीदरम्यान नीता ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता पोलिसांना १९ लाख ५० हजारांची रोकड सापडली. पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी संतोष कुमार पटेल या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. हा तरुण मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. पुढील कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि आणि आयकर विभागाला यासंबंधी माहिती देण्यात आलं असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात राहणार्&zwj....
अधिक वाचा