ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दंतेवाडामध्ये महिला कमांडोंनी केला 2 नक्षल्यांचा खात्मा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दंतेवाडामध्ये महिला कमांडोंनी केला 2 नक्षल्यांचा खात्मा

शहर : ahiwara

दंतेवाडा येथे डीआरजी आणि एसटीएफच्या पथकाने आज एक चांगली कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्या आला. अरनपूरजवळच्या गोंदरसच्या जंगलात आज पहाटे कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. दंतेवाडामधील अरनपूर परिसराजवळ गोंदरसच्या जंगलात बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास नक्षलवादी आणि डीआरजी, एसटीएफ पथकातील जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केलं. घटनास्थळावरून रायफल, स्फोटकं आणि अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली. ’डीआरजी आणि एसटीएफनं केलेल्या संयुक्त कारवाईत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड फिमेल कमांडोज (दंतेश्वरी दल) सहभागी झाल्या होत्या. या दलामध्ये नक्षली अथवा शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्नींना सहभागी करून घेतलं जातं. एकूण 30 महिला या दलात असतात. त्यांना प्रशिक्षण दिलं जातं,’ अशी माहिती दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली.

मागे

सासवडमध्ये मिलिंद एकबोटेंना केली मारहाण
सासवडमध्ये मिलिंद एकबोटेंना केली मारहाण

सासवड येथील एका कार्यक्रमात मिलिंद एकबोटेंना मारहाण झाल्याची घटना घडली अस....

अधिक वाचा

पुढे  

पुणे विमानतळावर 31 लाखांचे सोने जप्त
पुणे विमानतळावर 31 लाखांचे सोने जप्त

दुंबइमधून डोक्यावर घातलेल्या विगमध्ये लपवून आणलेले 31 लाखांचे 957.10 गॅ्रम सोन....

Read more