By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
२०१२ मध्ये घडलेल्या दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडिता 'निर्भया' ला तब्बल आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. क्रूरकर्म केलेल्या चारही दोषींना सकाळी साडे पाच वाजता फाशी देण्यात आली. निर्भयासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्या प्रकारासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की चारही दोषींना एकत्र फाशी देण्यात आली.
Delhi: Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim show victory sign after Supreme Court's dismissal of death row convict Pawan Gupta's plea seeking stay on execution. pic.twitter.com/FPDy0hgisv
— ANI (@ANI) March 19, 2020
सकाळी चार वाजता दोषींना आंघोळ घालून नवीन कपडे देण्यात आले. या चारही दोषींना जल्लाद पवनकडून फाशी देण्यात आली. एकूण सात वर्षे तीन महिने आणि तीन दिवसांनी या दोषींना मृत्यूदंडांची शिक्षा मिळाली. एवढ्या वर्षात या दोषींनी पळ काढण्याचे अनेक मार्ग अवलंबले पण अखेर त्यांना आज फाशी झाली आहे. आजचा दिवस हा 'न्याय दिवस' म्हणून घोषित करावा अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींची फाशी टाळण्यासाठी त्यांच्या वकिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. रात्री हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वात शेवटचा प्रयत्न म्हणून दोषींचे वकील ए पी सिंग यांनी मध्य रात्रीनंतर अडीच वाजता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा दाद मागितली. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले.जस्टिस आर भानुमती, जस्टिस अशओक भूषण आणि जस्टिस ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे युक्तीवाद केला. यावेळी चौघांपैकी एक दोषी पवन याच्या वयाचा मुद्दा सिंग यांनी सुप्रीम कोर्टात मांडला. त्यावर आक्षेप घेत, कनिष्ठ न्यायालय, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही या आधी अल्पवयीन असल्याचा मुद्दा नाकारल्याचं खंडपीठानं सांगितलं. तसंच या पूर्वी झालेल्या सुनावणीतलेच मुद्दे आताही मांडले जात असल्याकडेही खंडपीठानं दोषींचे वकील ए पी सिंग यांचं लक्ष वेधलं.
Tihar jail officials to ANI: All four 2012 Delhi gang-rape death row convicts have been brought to the place where they will be hanged shortly. pic.twitter.com/dAaG5kiLsx
— ANI (@ANI) March 19, 2020
चौघा दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, त्याला तुम्ही कशाच्या आधारावर आव्हान देत आहात असा थेट प्रश्न यावेळी खंडपीठानं विचारला. आणि ही याचिका निकाली काढली. त्याबरोबरच दोषींची फाशी टाळण्याचा त्यांच्या वकिलांचा अखेरचाही प्रयत्न फोल ठरला. आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला.
Delhi: Security deployed outside Tihar jail, where the four 2012 Delhi gang-rape death row convicts will be hanged shortly. pic.twitter.com/QxyQi0XnWD
— ANI (@ANI) March 19, 2020
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघाही गुन्हेगारांना प....
अधिक वाचा