By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 35 लाख 85 हजार रुपयांचे सोने जप्त केले असून सोने तस्करीप्रकरणी दोन महिलांचे सीमा शुल्क कायद्याखाली जबाब नोंदवून घेतले. विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारी घेत असतात. हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारी गस्तीवर असताना एक महिला प्रवासी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. तिची झडती घेतली असता तिच्याकडून सहा क्रूड गोल्डच्या बांगड्या आणि एक गोल्ड बार जप्त केला. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 11 लाख 75 हजार 802 रुपये इतकी आहे. तिने गोल्ड बार हा बुटात लपवला होता. तर दुसर्या कारवाईत एका महिलेची एआययूच्या अधिकार्यांनी झडती घेतली असता तिच्याकडून 24 लाख 9 हजार 526 रुपयांचे सोने जप्त केले. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी त्या दोघींचा सीमा शुल्क कायद्याखाली जबाब नोंदवून घेतला असून सोने जप्त केले.
मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांना पदावरून निलंबीत करण्यात आ....
अधिक वाचा