By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 26, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
मुले म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं पण काही नराधाम या मुलांचे अपहरण करून भीक मागायला लावतात. तर काहीजण खंडणीसाठी त्यांचा ओलीस ठेवतात इच्छापूर्ती झाली नाही की त्यांची हत्या करतात. तर कित्येक बेपत्ता झालेली मुलं सापडतही नाहीत गेल्या १० वर्षात अशा प्रकारे ७ लाखांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. मुंबई दिल्ली सह अनेक राज्यात मुले बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे, यातील 60% मुलांचा शोध लागलेला नाही. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी गृहमंत्रालयाने एक विशेष विभाग स्थापन करावा अशी मागणी काँग्रेसचे खासदार टी. सुब्बीरामी रेड्डी यांनी काल राज्यसभेत केली.
यातील धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलांना भिक्षेकरी अथवा देहव्यापारात लोटले जाते. रोजगाराच्या शोधात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या स्थलांतर स्थलांतरितांच्या मुलांना अधिक लक्ष केले जात असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे, दर ८ मिनिटाला एक मूल देशात बेपत्ता होते, अशी माहिती एन.सी.आर बी यांनी दिली आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी सहाय्यता विभाग निर्माण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर सरकारने अशा मुलांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन स्माई” घालविणे असले तरी ही मुले बेपत्ता होण्याच्या घटना सुरूच आहे
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत अ....
अधिक वाचा