ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 07:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक

शहर : मुंबई

अशिक्षित बोगस डॉक्टरा समवेत 5 बोगस डॉक्टरांना प्रकटीकरण शाखेच्या कक्ष 3 च्या पोलिसांनी धाड घालून अटक केली आहे. हे डॉक्टर नागपाडा आणि भोईवाडा परिसरात गेली 10 वर्ष दवाखाना चालवत होती.समशेर कदिर शेख, अन्वर हुसेन, नईम शेख, नवाब हुसैन, रिझवानुद्दीन बंजारा या पाच बोगस डॉक्टरांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे पाचही जण नागपाडा, भोईवडा, करीरोड भागात दवाखाना चालवत होते. यातील एक जण तर अशिक्षित आहे तर बाकी 7 वी ते 12 वी पर्यंत शिकलेले आहेत. गेली 10 वर्ष हे आपले दवाखाने चालवत होते.अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र आहे. पण ते प्रमाणापत्र दुसऱ्याच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. . पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप पोलिसांपर्यंत आलेली नाही. अगदी सध्या आजारापासून ते लैगिंक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे.पोलिसांनी अटक करुन या आरोपींना कोर्टात हजर केलं. या पाचही बोगस डॉक्टरांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मागे

चौकशीसाठी तिहार तुरुंगात गेलेल्या ईडी अधिकाऱ्यांनी पी.चिदंबरम  यांना घेतले ताब्यात
चौकशीसाठी तिहार तुरुंगात गेलेल्या ईडी अधिकाऱ्यांनी पी.चिदंबरम यांना घेतले ताब्यात

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबर....

अधिक वाचा

पुढे  

कमलेश तिवारी हत्या : माहिती देणाऱ्यास प्रत्येकी अडीच लाखाचे बक्षिस
कमलेश तिवारी हत्या : माहिती देणाऱ्यास प्रत्येकी अडीच लाखाचे बक्षिस

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली....

Read more