By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बुलढाणा
बुलडाण्यामध्ये मेहकर-डोनगाव रस्त्यावर भीषण अपघात आंबेडकर जयंती साजरी करून परतताना झालेल्या अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. स्कॉर्पिओ आणि ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारा अंजनी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. जुमडे कुटुंब डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी मध्य प्रदेशातील महू येथे गेले होते. जुमडे कुटुंब स्कॉर्पिओमधून प्रवास करत होतं. परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात जुमडे कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी आहे. जुमडे कुटुंब मेहकर तालुक्यातील अंजनी गावचे रहिवासी होते. काळाने अशा पद्धतीने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मुंबईमध्ये धारावी परिसरात रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या धारावीतील....
अधिक वाचा