ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2019 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

शहर : मुंबई

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या घटनेमुळे देशात संतापाचे वातावरण असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुर्ला येथे बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. सतत होणाऱ्य़ा या बलात्कारांच्या घटनांमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

एएनआय'नं यासंबंधी वृत्त दिलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्याचप्रमाणे त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप त्यांचे नाव कळू शकलेलं नाही.

मुलींसाठी सुरक्षित असलेली मुंबई आता असुरक्षित झाली असल्याचं दिसून येत आहे. हैदराबादमधील घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्रील विविध भागांत त्याचे पडसाद उमटले आहे. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

गुरूवारी हैदराबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करण्यात अली. माणूसकीला काळीमा फसणाऱ्या या घटनेला काही दिवस देखील उलटले नसताना मुंबईत अवघ्या वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. त्यामुळे पुन्हा असे सिद्ध होते की देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात मुली सुरक्षित नाहीत.

मागे

तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय
तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

जिल्ह्यात आज(मंगळवार) एका तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांना सं....

अधिक वाचा

पुढे  

आपसात वादातून जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, सात जणांचा मृत्यू
आपसात वादातून जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, सात जणांचा मृत्यू

इंडो-तिबेटियन सीमा पोलिसातील (आयटीबीपी) जवानांमध्ये आपापसात झालेल्या वादा....

Read more