By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 05, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे : पुणे स्टेशनलगत असलेल्या घोरपडी यार्डमध्ये साफसफाई करीत असतांना आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये बोगीतील स्वच्छतागृहात एके-४७ रायफलची ७ जीवंत काडतुसे आणि ४ बुलेट्स आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोलकाताहून पुणे स्टेशनला आलेली आझाद हिंद एक्सप्रेस साफसफाईसाठी घोरपडी यार्ड येथे लावण्यात आली होती. कर्मचार्यांच्या साफसफाई दरम्यान बोगी क्र.एस २ मधील स्वच्छतागृहाच्या कचराकुंडीत एके-४७ रायफलची ७ जीवंत काडतुसे आणि ४ बुलेट्स आढळून आले. याची दखल घेत तातडीने स्वच्छता विभागाच्या व्यवस्थापकाने या संदर्भातील माहिती रेल्वे पोलीस फोर्स आरपीएफला दिली, आणि पुणे विभागाच्या लोहमार्ग पोलिसांनाही बोलवण्यात आले.
आझाद हिंद एक्सप्रेसच्या बोगीत सापडलेले ११ जीवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
आसाम : आसामच्या डिब्रुगड परिसरात एका नदीला भीषण आग लागल्य....
अधिक वाचा